Wednesday, November 11, 2026
HomeAheriसंकटात सापडलेल्या कोंकावार कुटुंबाला राजे अम्ब्रिशराव महाराजांचा मदतीचा हात...

संकटात सापडलेल्या कोंकावार कुटुंबाला राजे अम्ब्रिशराव महाराजांचा मदतीचा हात…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

गंभीर आजाराने त्रस्त महिलेच्या उपचारासाठी आर्थिक मदत; सामाजिक बांधिलकीतून जपली माणुसकी,

गडचिरोली /अहेरी, 11 नोव्हेंबर 2026::- अहेरी तालुक्यातील महागाव येथील गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या महिलेच्या कुटुंबाला माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी आर्थिक मदत करून दिलासा दिला. कठीण परिस्थितीत सापडलेल्या कोंकावार कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत त्यांनी सामाजिक संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे.

महागाव येथील सौ. रामक्का बानय्या कोंकावार या गेल्या काही दिवसांपासून फुफ्फुसाच्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. कुटुंबीयांनी त्यांच्या उपचारासाठी नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, आजार चौथ्या टप्प्यात पोहोचल्याने उपचारांनंतरही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुन्हा महागाव येथील घरी आणण्यात आले असून सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे कुटुंबीयांसमोर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट निर्माण झाले आहे.

कोंकावार कुटुंबाची ही परिस्थिती समजल्यानंतर महागाव बुज येथील राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे कट्टर समर्थक तथा माजी उपसरपंच संजय अलोने यांनी दूरध्वनीद्वारे महाराजांना माहिती दिली. या माहितीची तातडीने दखल घेत राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी कुटुंबाला आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.

आजारपणामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबाला या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे. गरजू नागरिकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे या मदतीतून दिसून आले. राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी पुन्हा एकदा आपल्या सामाजिक कार्यातून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular