Wednesday, November 11, 2026
HomeDhanoraनक्षलवादाच्या सावटातून मुक्त झालेल्या गडचिरोलीत आनंदाची दिवाळी! परसवाडीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे...

नक्षलवादाच्या सावटातून मुक्त झालेल्या गडचिरोलीत आनंदाची दिवाळी! परसवाडीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे आदिवासी बांधवांसोबत रमले…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

ग्रामस्थांना दिवाळी फराळ व ब्लँकेटचे वाटप; गोंडी भाषेत साधला संवाद, गावाच्या विकासाचा घेतला आढावा,

गडचिरोली /धानोरा, 11 नोव्हेंबर 2026::-अनेक दशकांपासून नक्षलवादाच्या सावटाखाली असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात यंदा शांतता आणि नव्या आशेच्या वातावरणात दिवाळी साजरी होत आहे. जिल्ह्याच्या या ऐतिहासिक पर्वाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी धानोरा तालुक्यातील परसवाडी येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा आनंदोत्सव साजरा केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना दिवाळी फराळ आणि ब्लँकेटचे वाटप करून सणाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवादाविरोधात राबविण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे जिल्ह्यात शांतता प्रस्थापित होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण बदल घडत आहेत. सुरक्षा दलांचे समर्पण, जवानांचे बलिदान आणि शासनाच्या विकासाभिमुख धोरणांमुळे दुर्गम भागातही विश्वासाचे वातावरण निर्माण होत आहे.

एकेकाळी नक्षलवादाच्या भीतीमुळे सण-उत्सव साजरे करताना अनेक मर्यादा असलेल्या या भागात आता आनंद आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. या परिवर्तनाचा आनंद आदिवासी बांधवांसोबत साजरा करण्याच्या उद्देशाने आमदार डॉ. नरोटे यांनी परसवाडीला भेट दिली.

या भेटीदरम्यान आमदार डॉ. नरोटे यांनी ग्रामस्थांशी गोंडी भाषेत संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस केली. गावातील मूलभूत सुविधा, विकासकामे, स्थानिक समस्या आणि ग्रामस्थांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्यातील हा संवाद गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.

यावेळी आमदार डॉ. नरोटे यांनी श्री. हरीशचंद्र मडावी यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला. मडावी कुटुंबीयांनी केलेला प्रेमळ पाहुणचार आणि ग्रामस्थांनी दाखविलेली आपुलकी यामुळे या भेटीला कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले. दिवाळी फराळ, आपुलकीचा संवाद आणि एकत्रित भोजनामुळे परसवाडीतील हा आनंदोत्सव ग्रामस्थांसाठी संस्मरणीय ठरला.

याप्रसंगी भाजयुमो जिल्हा प्रभारी सारंगजी साळवे, भाजपा तालुका महामंत्री सुभाषजी धाईत, नगरपंचायत धानोरा गटनेते तथा नगरसेवक संजयजी कुंडू, भाजपा तालुका कोषाध्यक्ष सुभाषजी खोबरे, युवा नेते अविनाशजी पोरेटी, लोकेशजी मशाखेत्री, नंदूजी शेंदरे आणि भाजयुमो तालुकाध्यक्ष सौरभजी सहारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular