VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास राहणार उपस्थित,
गडचिरोली, 14 नोव्हेंबर 2026 :-भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या जनजातीय गौरव दिनाच्या राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाला राज्यातील दोन मंत्र्यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे सकाळी ९ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, गडचिरोली येथे आयोजित राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर त्यांचे शासकीय विश्रामगृह येथे आगमन होणार असून, सोयीनुसार ते नागपूरकडे प्रयाण करतील.
तर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ हे सकाळी ७.३० वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथून गडचिरोलीकडे प्रयाण करतील. सकाळी ८.३० वाजता ते जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता ते गडचिरोली येथून नागपूरकडे रवाना होतील.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या राष्ट्रीय महोत्सवातून आदिवासी समाजाचा समृद्ध इतिहास, शौर्य, परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारसा देशासमोर मांडला जात आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास राज्यातील दोन मंत्र्यांची उपस्थिती लाभणार असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
