VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
१५ नोव्हेंबरला जिल्हा क्रीडा संकुलातील उद्घाटन समारंभासह गोंडवाना विद्यापीठातील कार्यक्रमाला लावणार हजेरी,
गडचिरोली, 14 नोव्हेंबर 2026 :-राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार विभागाचे राज्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे १४ व १५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात जनजातीय गौरव दिन आणि राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासह विविध कार्यक्रमांना उपस्थिती राहणार आहे.
शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांचे गडचिरोली येथील पोलीस विश्रामगृहात आगमन होणार असून तेथे त्यांचा मुक्काम राहणार आहे.
रविवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित जनजातीय गौरव दिन व राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास ते उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी २.३० वाजता गोंडवाना विद्यापीठाच्या नवीन सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.
दौऱ्याच्या अखेरीस दुपारी २.५५ वाजता पोलीस परेड ग्राउंड येथून ते रामटेककडे प्रयाण करतील. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
