VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)
गडचिरोली,१४ ऑक्टोंबर २०२३ ::- भारत सरकारच्या मागणी वरून संयुक्त राष्ट्र समितीच्या आमसभेने 2023 वर्ष जागतीक पातळीवर मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य लाभावे त्यांच्या आहाराच्या दैनदिनीत मिलेट्स चे प्रमाण वाढावे या करीता जागतिक पातळीवर विशेषतः भारतात विविध विभागाच्या वतीने ठीक – ठिकाणी मिलेस्ट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते आहे.
याचेच औचित्य साधून नेहरू युवा केंद्र गडचिरोली चे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनात, मिशन लाईफ अंतर्गत नेहरू युवा केंद्र, गडचिरोली आणि शिवकल्याण संस्थेच्या वतीने गडचिरोली येते मिलेट्स महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
200 हुन अधिक युवक – युवतीणी व नागरिकांनी या मिलेट्स उत्सवाला भेट दिली. या उत्सवात मिलेट्स संदर्भात माहिती असलेली विविध प्रकारची फलके, विविध मिलेट्स पदार्थ ठेवण्यात आलेली होती.
शिवकल्याण संस्था अध्यक्ष अनुप कोहळे यांनी सहभागी सर्वांना मिलेट्स अन्न पदार्थ खाण्याच्या पद्धती व आरोग्यदायक फायदे या संदर्भात पुरेपूर माहिती दिली. मिलेट्स उत्सवाच्या यशस्वी आयोजनाकरीता आशिष मशाखेत्री,
गौरव कोल्हटवार, सूरज गोरलावार, दीपक मंडल, अनिकेत संदूकवार, रोशन कोहळे, मयूर गावतुरे, संतोषी सूत्रपवार, पूजा नींदेकर सह नेहरू युवा केंद्र आणि शिवकल्याण संस्थेच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
