VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)
अहेरी,१६ ऑक्टोंबर २०२३ ::- अहेरी इस्टेटचे ६ वे राजे तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवस निमित्ताने आज क्रीडा संकुल येथे भव्य रक्तदान कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते सत्यनारायण मंचालवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला त्यानंतर सुमारे 30 ते 35 रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर बस स्टँड चौक येथे अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला, सिरोंचा तालुक्यातील अनेक ग्रामीण क्षेत्रातील लोकांनी अन्नदानाच्या आस्वाद घेतले अन्नदानाचा कार्यक्रम आणि रक्तदानाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दिलीप सेनिगारपु यांच्या नेतृत्वात पार पाडला यावेळीसंदीप राचर्लावार, रंगू बापू ,संतोष पडालवार शंकर नरहरी, कलाम हुसेन, रवि चकिनारापुवार, श्रीधर आनकरी, किरण संगेम, किरण कुलसंगे, रमेश मुंगीवार, सीतापती गट्टू सतीश गट्टू, जयेंद्र श्रीपती, भास्कर गुडीमेडला ,श्रीनाथ राऊत, देवेंद्र रंगू माधव कासर्लावार, महेश कोलावार, व जगदंबा फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीतेने पार पाडला.
