Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliअहेरी विधानसभा क्षेत्रात आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा झंजावत दौरा...

अहेरी विधानसभा क्षेत्रात आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा झंजावत दौरा…

VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)

एटापल्ली, मुलचेरा व आष्टी येथे संपर्क ते समर्थन अभियान.

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील समस्या जाणून घेण्यासाठी दौरा.

विरोधकांना प्रतिउत्तर देण्यासाठी गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रात दौरा करणार.

गडचिरोली, १७ ऑक्टोंबर २०२३ ::- गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर यांनी आज अहेरी विधानसभा क्षेत्रातील एटापल्ली मुलचेरा, येथे वस्ती संपर्क अभियान राबविला.यावेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकारच्या व पंतप्रधान मा.नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी कामांची माहिती व आपल्या ९ वर्षाच्या कार्यकाळाचा संक्षिप्त अहवाल दिला.

याप्रसंगी उपस्थित एटापल्ली तालुका अध्यक्ष निखिल गादेवार, मुलचेरा तालुका अध्यक्ष संजीव सरकार, मुलचेरा भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख , जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, युवा नेते प्रतिक राठी, भोजराज भगत, रामचंद्र वरवाडे, दीपक वासेकर यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular