VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)
पत्रकार परिषदेतून जिल्हा ट्रान्सपोर्टर संघटनेची मागणी.
चामोर्शी,२० ऑक्टोंबर २०२३ ::- सुरजागड येथील लोहखनिज वाहतुकीची परवानगी जिल्ह्यातील सर्व ट्रॉन्सपोर्टना क्रमवार देण्यात यावी अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा ईशारा जिल्हा ट्रॉन्सपोर्टर संघटनेच्यावतीने पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे.
पत्रकार परिषदेत माहिती देतांना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या लोहखनिजांची वाहतूक चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील लॉयड मेटल आणि एनर्जी प्रकल्पात व जिल्ह्या बाहेरील मानिकगड,बल्लारशा, केळझर येथे दररोज हजारो ट्रकच्या माध्यमातून केली जात आहे. पंरतु आलापल्ली, अहेरी, एटापल्ली भागातील ट्रॉन्सपोर्टर वगळता जिल्ह्यातील इतर ट्रॉन्सपोर्टरनां वाहतूकीकरीता पाहिजे त्या प्रमाणात काम मिळत नसल्याने तिन चार दिवस ट्रक केवळ नंबर लावण्यासाठी उभे ठेवावे लागते. त्यामुळे घेतलेले बँकेचे कर्ज, ड्रायव्हरचा पगार, कुटुंबाचा खर्च कसा करायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याबाबत संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच आमदार, खासदार व मंत्री यांच्याकडे चर्चा करण्यासाठी गेले असता ते बोलायला तयार नाहीत.
मात्र अहेरी, एटापल्ली, तालुक्यातील ट्रान्सपोर्टरना विशेष सवलत देऊन सरळ लोड देण्यात येत आहे. हा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी दहा हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल असे सांगण्यात आले. मग दुजाभाव का केला जात आहे. . त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी यांना या संदर्भात निवेदन देऊन न्याय मागण्यासाठी विनंती केली आहे. तेव्हा जिल्ह्यातील स्थानिक ट्रान्सपोर्टरना कंपनीच्या खमनचेरु पार्कंग मध्ये नंबर न लावता आम्हाला मद्दीगुड्डम स्टॉक यार्ड मधुन नंबर लावुन लोड करुन देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा येत्या काळात गडचिरोली जिल्हातील ट्रॉन्सपोर्टर संघटना आष्टी येथे चक्काजाम आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निकेश गद्देवार, महादेव थोरेवार, नेताजी गुळंकवार, संतोष येंबडवार, दीपक गुंफलवार, मधुकर चिंतलवार, रविंद्र येंबडवार, राकेश शर्मा, साईबाबा गोडसेलवार, अमोल पवार, मिहिर डे, गुड्डू नागुलवार, अंकुश मंडल, रुषीकेश देवनाथ, अनिल खोब्रागडे, संजय नंदी, मनोज मालाकार, अमीत रॉय, सुकुमार मंडल आदी उपस्थित होते.
