Saturday, May 23, 2026
HomeAheriअहेरी ईस्टेटचे राजघराण्यातील होणारा "दसरा महोत्सव" सोहळा, संपूर्ण देशात लोकप्रिय,निमंत्रण पत्रिका...

अहेरी ईस्टेटचे राजघराण्यातील होणारा “दसरा महोत्सव” सोहळा, संपूर्ण देशात लोकप्रिय,निमंत्रण पत्रिका…

VAINGANGA NEWS 24 ( विशेष प्रतिनिधी)

अहेरी,२० ऑक्टोंबर २०२३ ::- अहेरी स्टेटचा २५० वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेला अहेरी येथील राजघराण्याचा (दसरा उत्सव) संपूर्ण देशात एक सांस्कृतिक व धार्मिक उत्सव म्हणून प्रसिध्द आहे. यानिमित्ताने रुक्मिणी महालात विविध कार्यक्रम होत असून ‘अहेरी इस्टेट’ रोषणाईने झगमगली असते.     या वर्षी “दसरा महोत्सव” २४ ऑक्टोबर, मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे, अहेरी इस्टेटचे ६ वे राजे श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे ऐतिहासिक पालखीत विराजमान होहून सीमोल्लंघन करणे तसेच त्यानंतर होणारे अहेरी राजमहाल समोर राजेंचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने अहेरी येथे जनतेची उपस्थिती असते.

 २५० वर्षांपूर्वी अहेरी इस्टेटचा पसारा ५५० चौरस मैल परिसरात होता. ५४८ गावांची जमीनदारी व १८ गावांची मालकी होती.पाहिले भुजंगराव महाराज होते,

 तेव्हापासून दसरा उत्सव सुरू केला, त्यानंतर राजे विश्वेश्वरराव महाराज, राजे सत्यवानराव महाराज आणि विद्यमान राजे अंब्रीशराव महाराज ही संस्कृती जपत आहेत. गडअहेरी नाल्याच्या काठावरील आपटय़ाच्या झाडाच्या पूजेनंतर राजा झाडाची पाने तोडून सीमोल्लंघन झाल्याची ग्वाही देऊन गढीबाईदेवीसमोर नतमस्तक होतो. राजघाटावरील समाधीसमोर राजाने माथा टेकावा, असा रिवाज परंपरे नुसार चालू आहे.या वर्षी सुध्दा हजारोच्या संख्येने मित्रदीपक सोहळ्यात सामील होऊन राजे आत्राम घराण्याच्या दसरा महोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular