VAINGANGA NEWS 24 ( विशेष प्रतिनिधी)
चामोर्शी २१ ऑक्टोंबर २०२३ ::- नगर पंचायत चामोर्शी कार्यालय मार्फत शहरात सिंगल युज प्लास्टिक वापर करणाऱ्या विक्रेत्यांवर धडक कार्यवाही करण्यात आली. शासनाद्वारे ७५ मायक्रोन पेक्षा कमी जाळी चे प्लास्टिकवर वापर, साठवणूक, वितरण व विक्रीवर बंदी करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा शहरतील काही आस्थापने सदर प्लास्टिक चे उपयोग करतांना आढळले. कार्यवाही दरम्यान एकूण ५३ किलो प्लास्टिक जप्त करून विविध आस्थापनांकडून एकूण रु. २५५००/- दंड वसूल करण्यात आले आहे.
मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांचे मार्गदर्शनाखाली चामोर्शी शहरामध्ये प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात आले. या मध्ये नगर पंचायत कर्मचारी अलकेश बन्सोड , दिलीप लाडे, विजय पेद्दीवार, रमेश धोडरे, श्रीकांत नैताम, आकाश कोडवते,सुभाष कनकुटलावार, संतोष भांडेकर, सय्यद शेख,सफाई कामगार ऋषी गोरडवार,रोहिदास राऊत, नरेंद्र बन्सोड यांचे द्वारे कार्यवाही राबविण्यात आली तसेच दुकानदार व नागरिकांमध्ये प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम व त्याद्वारे होणारे प्रदूषण याबाबत सुद्धा जनजागृती करण्यात आली आहे. सदर मोहीम मध्ये चामोर्शी नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या दुकाने/ आस्थापनांनी सहकार्य केले व पुन्हा प्लास्टिक वापर नाही करणार म्हणून हमी दिले.
