VAINGANGA NEWS 24 (विशेष प्रतिनिधी)
गडचिरोली,२२ ऑक्टोंबर २०२३ ::- कंत्राटी भरती रद्द करा या मागणीला घेऊन राज्यभरातील युवक, बेरोजगार तरुण विविध संघटना व काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे पाहुण राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांनीच कंत्राटी भरती सुरु केल्याचा आरोप करुन आपण कंत्राटी भरती रद्द करत असल्याचे ढोंग केले. वास्तविक जिल्हा परिषदच्या शाळेचे खाजगीकरण करण्याचा आणि विविध विभागातील पदाची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय भाजपा सरकारच्या काळात घेण्यात आले. जर भाजपा वाल्यांना कंत्राटी भरतीचा विरोध होता, तर आता महाविकास आघाडीवर आरोप करण्याअगोदर 2014 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच कंत्राटी भरतीचा GR का रद्द केले नाही? आताच ह्यांना ह्याबाबत कस काय सुचले, मुळात भाजपा पक्षच कंत्राटी भरतीचे समर्थन कर्ते आहे, आता युवकांचा या भरतीला विरोध होतांना पाहुण भाजपा नेते कंत्राटी भरतीच्या संदर्भात फक्त सोंग करीत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपा ची सत्ता असताना देखील भाजप नेते महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कासाठी बोलत नाही, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मागील वर्षभरात फक्त 2 पर्यटन दौरे झाले, त्याव्यतिरिक्त कधीही ते जिल्ह्यात आले नाही, जिल्ह्यातील शेतकरी पाण्यासाठी त्रस्त आहे, जंगली हत्तीकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतक्या समस्या जिल्ह्यात असताना, सुरजागडच्या वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली, रोज अपघातात कित्येक लोकांचा जीव जात आहे. मात्र स्थानिक भाजप नेत्यांनी कधीही या करीता आंदोलन केले नाही, मात्र आता जनतेची दिशाभूल करण्याचा काम, भाजपा नेते करीत आहे. स्वतः सत्तेत असून देखील संसद बंद पाडण्याचा काम भाजपा नेते करतात, भाजपा ची ही भूमिका म्हणजे “नाचता येईना आंगण वाकडे” अशी आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, युवक यांना कधीही माफ करणार नाही आणि यांच्या सोंगाळ्या आंदोलनाला आता बळी पडणार नाही. अशी टीका गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी भाजपाच्या आंदोलनावर केली आहे.
