Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliअहमदनगर येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य महामंडळ सभेला गडचिरोली...

अहमदनगर येथे आयोजित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य महामंडळ सभेला गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षक बंधू-भगिनिंनी उपस्थित राहण्याचे आवाहन , रघुनाथ भांडेकर सर – जि.प्रा.शि. सं. जिल्हा अध्यक्ष….

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

 गडचिरोली, २३ ऑक्टोंबर २०२३ ::- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीची सहविचार सभा वडसा येथे दिनांक 21/10/2023 ला संपन्न झाली. त्यात खाली नमूद मुद्द्यासह इतर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 29 आॉक्टोंबर ला अहमदनगर येथे पार पडणाऱ्या राज्य महामंडळ सभेकरीता गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षकांच्या राज्यस्तरावरील प्रलंबित मागण्यांच्या निवेदनाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच प्रत्येक तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री.रघुनाथ भांडेकर सर यांचे वतीने करण्यात आले.      याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष श्री .अशोकराव रायसिडाम सर, प्राथमिक शिक्षक संघाचे मागदर्शक तथा जिल्हा सल्लागार श्री गजाननजी पिपरे सर,श्री भुजंगराव नारनवरे सर,प्राथमिक शिक्षक संघ कुरखेडाचे तालुकाध्यक्ष श्री एकनाथजी पिलारे सर, प्राथमिक शिक्षक संघ वडसाचे तालुकाध्यक्ष श्री. शत्रुघ्न झुरे सर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका आरमोरीचे तालुका सरचिटणीस श्री. किशोर पिंपळकर सर,प्राथमिक शिक्षक संघ तालुका मुलचेराचे कार्याध्यक्ष तथा डि.सि.पि.एस.संघटना मुलचेराचे तालुकाध्यक्ष श्री. अशोक बोरकुटे सर, प्राथमिक शिक्षक संघाचे मार्गदर्शक तथा सल्लागार श्री विश्वनाथ म्हस्के सर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मागदर्शक तथा जिल्हा सल्लागार राजेश ऊईके सर,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा वडसाचे तालुका कोषाध्यक्ष श्री. देवचंद म्हस्के सर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मागदर्शक तथा जिल्हासलागार सदानंद लांजेवार सर,कुरखेडा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस श्री ए.ए.खाॅन सर,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कुशल व धडाडीचे संघटक श्री दुष्यंत मांडवे सर,कुरखेडा प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्थेच्या सन्माननीय संचालिका तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हा महिला संघटिका श्रीमती हेमलता कुमरे मॅडम,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे संघटक श्री गायकवाड सर यांचेसह बहुसंख्य शिक्षक बंधु-भगिनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular