VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी
भामरागड, १७ नोव्हेंबर २०२३ ::- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त पिपली बुर्गी येथे भेट देऊन स्थानिक आदिवासी व पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी केली.त्यांच्या दौऱ्यानंतर रात्री भामरागड झाल्याचे तालुक्यातील पेनगुंडा येथे नक्षलवाद्यांनी पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आहे. दिनेश पुसू गावडे (२७) रा.लाहेरी ता. भामरागड असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येत असलेल्या पेनगुंडा गावात क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी रुपेश हा लाहेरी वरून १५ नोव्हेंबर रोजी पेनगुडा येथे गेला होता. दरम्यान, रात्रीच्या सुमारास संशयित नक्षलवाद्यांनी त्याची निर्घृणपणे हत्या केली.
प्रथमदर्शनी त्याच्या चेहऱ्यावर तीक्ष्ण हत्याराचे व्रण असून हत्येनंतर घटनास्थळी एक पत्रक आढळून आले आहे. त्यात दिनेश हा पोलीस खबरी असल्याचे नमूद आहे. पोलिसांनी मात्र तो खबरी नसल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीतील नक्षलग्रस्त दौरा केला. यावेळी माध्यमांसोबत संवाद साधताना जिल्ह्यातून नक्षलवादी हद्दपार म्हटले होते. परंतु त्याच रात्री नक्षल्यांनी तरुणाची हत्या केल्याने जिल्ह्यात पुन्हा नक्षलवाद सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
धोडराज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात असून मृत तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळच्या सुमारास शवविच्छेदनसाठी भामरागड येथे आणण्यात आले आहे.पोलीस दिनेशची हत्या नेमकी कश्यासाठी करण्यात आली हे स्पष्ट होईल असे पोलीस विभागाचे म्हणणे आहे.
