Saturday, September 26, 2026
HomeBhamragadपर्लकोटा नदीच्या पुरात दोन गंभीर रुग्णांना एसडीआरएफने दिला सुरक्षित मार्ग...

पर्लकोटा नदीच्या पुरात दोन गंभीर रुग्णांना एसडीआरएफने दिला सुरक्षित मार्ग…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

भामरागड–आलापल्ली मार्ग बंद; ६३ गावांचा संपर्क तुटला, बोटीच्या मदतीने रुग्णांना हेमलकसा गाठले,

गडचिरोली /भामरागड, 26 सप्टेंबर 2026::-पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड–आलापल्ली मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील तब्बल ६३ गावांचा संपर्क तुटला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पुरपरिस्थितीत भामरागड येथील दोन गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी हलविण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

रुग्णांची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकाने तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. एसडीआरएफच्या जवानांनी बोटीच्या साहाय्याने दोन्ही रुग्णांना पर्लकोटा नदी सुरक्षितपणे पार करून हेमलकसा येथे पोहोचविले.

यानंतर हेमलकसा येथून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून दोन्ही रुग्णांना पुढील उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. पुराच्या पाण्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प असतानाही एसडीआरएफच्या पथकाने दाखविलेल्या तत्परतेमुळे गंभीर रुग्णांना वेळेत उपचारासाठी हलविणे शक्य झाले.

दरम्यान, पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने भामरागड–आलापल्ली मार्गावरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी तालुक्यातील ६३ गावांचा संपर्क प्रभावित झाला असून, पूरस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular