Friday, May 22, 2026
HomeGadchiroliसिंचनासाठी पाण्याचा योग्य वापर करून उत्पादन घ्या,, उसेगाव ता.जि.गडचिरोली येथील बंधाऱ्याच्या पाहणीदरम्यान...

सिंचनासाठी पाण्याचा योग्य वापर करून उत्पादन घ्या,, उसेगाव ता.जि.गडचिरोली येथील बंधाऱ्याच्या पाहणीदरम्यान खासदार अशोक नेते यांचे आवाहन…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली,२० नोव्हेंबर २०२३ ::-नदीनाल्यांचा व पाण्याचा जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. तरीही उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणी समस्या निर्माण होते. मात्र, उसेगाव येथील नागरिकांनी पुढाकार घेऊन कठानी नदीवर श्रमदानातून बंधारा बांधला, त्या बंधाऱ्यांतील पाण्याचा शेतीसाठी योग्य वापर करून उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले.      तालुक्यांतर्गत येणाऱ्या उसेगाव येथील नागरिकांनी कठानी नदीवर श्रमदानातून बंधारा बांधला. यामुळे उसेगाव परिसरात कठानी नदी दुथडी भरून आहे. या बंधाऱ्यांची पाहणी करण्यासाठी खासदार अशोक नेते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, समय्या पसुला रविवार, १९ नोव्हेंबरला सायंकाळी उसेगाव येथे भेट दिली. यावेळी ते उपस्थित शेतकऱ्यांशी बोलत होते. 

 जिल्ह्यातील नदीनाल्यांवर यासारखे बंधारे बांधल्यास उन्हाळ्यातही जिल्हात पाणी समस्या निर्माण होणार नाही, यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. केवळ उपक्रम म्हणून बंधारे बांधून फायदा नाही तर त्या बंधाऱ्यांतील पाण्याचा वापर करून विविध उत्पादन पिके शेतकऱ्यांनी घ्यावे. असे याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी आवाहन केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular