Saturday, June 6, 2026
HomeEtapalliशाळेला शिक्षक नेमणूक करून द्यावी किंवा स्वंयसेवक नेमणूक ग्राम पंचायत स्तरावरून करून...

शाळेला शिक्षक नेमणूक करून द्यावी किंवा स्वंयसेवक नेमणूक ग्राम पंचायत स्तरावरून करून देण्यात यावे,,सचिन मोटकुरवार सचिव भाकपा एटापल्ली…

VAINGANGA NEWS 24

प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार

मा. अप्पर जिल्हाधिकारी साहेब अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अहेरी यांना निवेदन.

एटापल्ली, ३० नोव्हेंबर २०२३ ::- एटापल्ली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाळवी या गावातील शाळेत शिक्षकांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यास मोठा त्रास होत आहे. ( गाव- वाळवी ग्रामपंचायत- गट्टा तालुका- एटापल्ली ) शाळेत केवळ 1 शिक्षक आहेत 1ली ते 4 थी या चार वर्गाकरिता आणि एक शिक्षकावर 25 विद्यार्थी चा भार खूप जास्त आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळेवर शिकवणे शक्य होत नाही. आणि एकमेव शिक्षक रजेवर किवा ट्रेनिंग ला असताना शाळा बंद असते विद्यार्थी चे शैक्षणिक नुकसान होते.

       शाळेत शिक्षकांची संख्या वाढवण्यासाठी आपण कृपया तातडीने कार्यवाही करावी. यासाठी आपण शिक्षक नेमणूक करू शकता किंवा ग्राम पंचायत स्तरावरून स्वयंसेवक नेमणूक करू शकता.

         ग्राम पंचायत स्तरावरून स्वयंसेवक नेमणूक केल्यास विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत होईल आणि शाळा अधिक कार्यक्षम होईल. या निवेदनात भाकपा एटापल्ली शाळेत शिक्षकांची संख्या वाढवण्यासाठी मागणी करत आहे. शिक्षकांची संख्या वाढल्यास विदयार्थ्यांना शिकण्यास मदत होईल आणि शाळा अधिक कार्यक्षम होईल.

       शिक्षक नेमणूक करणे किंवा ग्राम पंचायत स्तरावरून स्वयंसेवक नेमणूक करण्याचा पर्याय देत आहे. शिक्षक नेमणूक करण्यासाठी सरकारकडून वेळ लागू शकतो. त्यामुळे ग्राम पंचायत स्तरावरून स्वयंसेवक नेमणूक केल्यास विद्यार्थ्यांना शिकण्यास तातडीने मदत होईल.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular