अवघ्या दोन दिवसात ४ सापांना जीवदान.
चामोर्शी, ३० नोव्हेंबर २०२३ ::- तालूक्यातील तळोधी (मोकासा) येथील गजानन देवतळे यांच्या शेतशिवारात बुधवारला दोन घोणस जातीचे साप असल्याची माहीती सर्पमित्र प्रथम कोत्तावार यास देण्यात आली,असता लगेच प्रथम कोत्तावार यांनी घटनास्थळ गाठून दोन्ही सापांना पकडले व जंगलात सोडून सापाला जीवनदान दिले.
याशिवाय जयनगर येथील प्रवीण बिश्वास यांच्या घरच्या मच्छी जाळीत दोन दीवसांपासून अटकून असलेले धामण जातीचा साप होता. या सापाला सुद्धा पकडून पाणी पाजून जखमेवर हडळ लावून जंगलात सोडून जीवदान दिले.
आणि आज सुधा एका शेतात ९ फुट ३२ किलोचा अजगर सापाला पकडून सर्पमित्र प्रथम कोत्तावार यांनी जीवनदान दिले.
अवघ्या दोन दिवसात ४ सापांना जीवदान दिले हे विशेष.
चामोर्शी तालुक्यातील प्रथम कोत्तावार हे ७ ते ८ वर्षा पासून जीवाचा विचार न करता सर्पमित्राचे काम करीत आहे. मात्र वनविभागा कडून त्यांना अजून पर्यंत सुरक्षा किट (स्नेक किट) आणि आयडेंटी कार्ड देण्यात आलेली नाही. तरी लवकरात लवकर वन विभागाकडून सर्पमित्र प्रथम कोत्तावार यांना स्नेक किट आणि आयडेंटी कार्ड देण्यात यावे, जेणेकरून काम करण्याची गती मी वाढावी अशी प्रथम कोत्तावार यांची वन विभाग चामोर्शीला मागणी आहे.
