VAINGANGA NEWS 24
प्रतिनिधी – महेंद्र सुल्वावार
येत्या १५ दिवसाच्या आत काम सुरू न केल्यास न. प.एटापल्लीचे पदाधिकाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा.
एटापल्ली, ०४ डिसेंबर २०२३ ::-नगरपंचायत एटापल्ली येथिल मुख्य रस्त्यावर मोठमोठेखड्डे पडलेले असल्यामुळे येथिल जनतेला वाहतुक व दळणवळण करणेकरिता तसेच सामान्य जनतेला रहदारीकरिता मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्यामुळे तेथिल मुख्य रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्याकरिता संदर्भिय पत्रान्वये सुचविण्यात आले होते. त्याप्रमाणे आपण संदर्भ क्र.03 नुसार सदर पत्रावर कार्यावाही करणेकरिता संबंधित कंत्राटदारास कळविले होते. परंतु 3-4 महिन्यांचा कालावधी लोटुनही रस्त्याचे बांधकामबाबत कसलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
याद्वारे आपणास सदर येथिल मुख्य रस्त्यावर मोठमोठेखड्डे पडलेले असून रस्त्यावरील धुळीमुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. तसेच अपघात होउन जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर मुख्य रस्ता येत्या 15 दिवसाच्या आत सुरु न केल्यास चक्का जाम आंदोलन करण्यात येईल.
