Saturday, May 23, 2026
HomeNagapurगडचिरोलीत आरोग्य यंत्रनेचे तीन तेरा...

गडचिरोलीत आरोग्य यंत्रनेचे तीन तेरा…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सह काँग्रेस नेत्यांनी घेतली आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट.

नागपूर, १३ डिसेंबर २०२३ ::- गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात आरोग्य यंत्रणेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्यानंतर ४८ तासांतच एका महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घळली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री हेच जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील जिल्ह्यातील समस्या आणि विकासकामाकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा झाले आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचे पद रिक्त असून ते भरल्या जात नाही, औषधींचा योग्य साठा नाही, शस्त्रक्रियेसाठी साधन नाही अशा परिस्थितीत सरकारच्या निष्काळजी मुळे अशा घटना  जिल्ह्यात घडत आहे. 

 या संदर्भात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या कानावर माहिती घातली असता नाना पटोले यांनी तात्काळ आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली व गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्याकडे विशेष प्राधान्याने लक्ष देऊन यावर तात्काळ उपाय योजना करण्यात यावे अशी मागणी आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांच्या कडे केली. 

यावेळी आमदार अभिजित वंजारी, आमदार धीरज लिंगाडे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे उपस्थित होते.

सोबतच राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कामावर घेऊन, आरोग्य विभागात खाली असणाऱ्या पदाची तातडीने भरती करण्यात यावी, नियमित औषधी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular