Friday, July 31, 2026
HomeChamorshiसोनापूर पुलावर पुराच्या पाण्याचा धोका...

सोनापूर पुलावर पुराच्या पाण्याचा धोका…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

दोन दुचाकी व एक सायकल पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती,

गडचिरोली/चामोर्शी,३० जुलै २०२६::- गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून सोनापूर–आष्टी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे. या दरम्यान पुलावरून दोन दुचाकी आणि एक सायकल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही, याबाबत अधिकृत माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.

दरम्यान, नागरिकांनी पुराच्या पाण्यातून वाहन घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular