Saturday, May 23, 2026
HomeChamorshiमार्कंडेश्वर जीर्णोद्धाराचा प्रश्न मार्गी न लागल्यास लोकप्रतिनिधींना गावबंदी करणार...

मार्कंडेश्वर जीर्णोद्धाराचा प्रश्न मार्गी न लागल्यास लोकप्रतिनिधींना गावबंदी करणार…

VAINGANGA NEWS 24 विशेष प्रतिनिधी 

 ० देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांचा पत्रकार परिषदेतून इशारा ०

चामोर्शी :- २०१५ पासून पुरातत्व विभागाच्या आणि लोकप्रतिनिधीच्या कमालीच्या दुर्लक्षितपणामुळे चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील मार्कंडेश्वर देवस्थानच्या जीर्णोद्धाराचे बांधकाम थंडबस्त्यात आहे. या बांधकामाला पूर्णत्वास नेण्यासाठी त्वरित गती देण्यासाठी या अधिवेशनात प्रश्न लावून धरावेत अन्यथा लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात येईल असा इशारा मार्कंडेश्वर देवस्थान समितीच्या वतीने देवस्थानचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर यांनी पत्रकार परिषदेतून दिला .

 या पत्रकार परिषदेला मार्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव मृत्यूंजय गायकवाड , सहसचिव रामूजी तिवाडे ,सरपंच संगीताताई मोगरे , उपसरपंच उमाकांत जुनघरे ,पोलीस पाटील आरती आभारे , ग्रा. पं . सदस्य देवराव तिवाडे , माजी सरपंच मुखरुजी शेंडे , सामाजिक कार्यकर्ते सुरेशजी बंडावर , राजूभाऊ मोगरे ,सी एन सुरपाम व गावकरी आदी उपस्थित होते. या अपूर्ण कामासंदर्भात देवस्थानच्या पदाधिका-यांनी केंद्रीय मंत्री , मुख्यमंत्री , खासदार , आमदार , पुरातत्व विभागाचे अधिकारी यांची अनेकदा भेट घेतली मात्र फक्त मिळाले आश्वासन? टेंडर निघाला काम होईल त्या आश्वासनाला आठ वर्ष झाले अद्याप जिर्णोद्धार कामाला सुरवात झाली नाही आता दोन महिन्या नंतर मार्कडेश्र्वर यात्रा येणार म्हणून 

 जीर्णोद्धाराच्या कामाचा मुहूर्त निघणार कधी? अशी विचारणा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे .ते पुढे बोलताना सांगितले की, जिल्ह्यातील एकमेव सांस्कृतिक वारसा असलेले आणि भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध पावलेल्या या मार्कंडेश्वर मंदिराकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे याचाच अर्थ या जिल्ह्यातील खासदार , आमदार आणि लोकप्रतिनिधी यांची कमालीची उदासीनता असल्याचे चित्र दिसून येत आहे म्हणून या मंदिराचे काम मार्गी न लागल्यास अशा लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा इशारा मार्कंडेश्वर देवस्थान आणि ग्रामपंचायत चे पदाधिकारी यांनी दिला . चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर देवस्थानचे नव्याने मंदिराचे बांधकाम करण्यासाठी 2015 साली अधीक्षिका नंदिनी शाहू व मस्के यांच्या उपस्थितीत मंदिर खोलण्यात आले. त्यानंतर त्यांची बदली होवून रायपुरच्या हाश्मी अधीक्षकाकडे काम देण्यात आले. परत नंतरच्या काळात रेड्डी अधीक्षक आले व येथून कामाला सुरुवात झाली. परंतु केलेल्या कामात दगडाची फिटिंग बरोबर न झाल्यामुळे काम बंद करण्यात आले. या कामाची सुरुवात मागील आठ वर्षांपासून झाली असून अजूनही काम पूर्णत्वास गेलेले नाही. वास्तविकता मंदिर बांधकामाला पुरातत्व विभागाकडून गती देणे गरजेचे होते. कारण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी वारंवार संबंधित विभागाला पत्रव्यवहार केला असून वेळोवेळी खासदार , आमदार ,मंत्री यांच्या भेटी घेतल्या त्यावेळी फक्त आश्वासन मिळत गेले टेंडर निघाला, काम होईना . आठ वर्ष झाले पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे आजतागायत मंदिर बांधकाम रखडलेले आहे. त्यामुळे येत्या काळात महाशिवरात्री यात्रेचा विचार करता संबंधित विभागाने मार्कंडेश्वर देवस्थान मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे . पुरातत्व विभागाचे अतिरिक्त महानिर्देशक डॉ. आर. त्रिपाठी यांच्याकडे हेमांडपंथी मार्कंडेश्वर देवस्थानच्या जिर्णोद्धार साठी निधी उपलब्ध करुन कामाला सुरुवात करावी अशी मागणी केली. होती मात्र तेही फोल ठरली 

यापूर्वीही अनेकदा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार , भारतीय पुरतत्व विभागाचे अधिकारी यांच्या भेटी घेऊन जिर्णोद्धाराचे काम मार्गी लावण्यासाठी भेटी घेउंन आठ वर्ष उलटूनहीअद्याप काम सुरू होऊ शकले नाही दोन महिन्यानंतर महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या मार्कडेश्र्वर यात्रेला येणाऱ्या भाविकांचा यावर्षीही हिरमोड होत असून अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींना गावबंदी केल्याशिवाय पर्याय नाही अशी माहिती मार्कंडेश्वर देवस्थान समिती आणि ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेतून दिली .

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular