Monday, October 26, 2026
HomeChamorshiगौरीपूर येथे किशोरवयीन आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन...

गौरीपूर येथे किशोरवयीन आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

पोषण, लैंगिक आरोग्य, व्यसनमुक्ती आणि ‘गुड टच-बॅड टच’बाबत विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन,

गडचिरोली /चामोर्शी,(गौरीपूर)26 ऑक्टोबर 2026::-किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, शारीरिक व मानसिक विकासाच्या टप्प्यावर योग्य माहिती मिळावी आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ग्रामीण रुग्णालय चामोर्शीच्या राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK) विभागाच्या वतीने लोकमान्य हिंदी विद्यालय, गौरीपूर येथे किशोरवयीन आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना किशोरवयीन अवस्थेतील शारीरिक बदल, वाढ व विकासासाठी पौष्टिक आहाराचे महत्त्व, प्रजनन व लैंगिक आरोग्य याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच RTI, STI, HIV/AIDS आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित आजारांविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यावर भर दिला जाणार आहे.

यासोबतच किशोरवयीन गर्भधारणेचे धोके, पॉक्सो कायदा, लैंगिक हिंसाचारापासून संरक्षण, ‘गुड टच-बॅड टच’ची ओळख आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या महत्त्वपूर्ण विषयांवरही विद्यार्थ्यांना जागरूक केले जाणार आहे. व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार आणि नियमित व्यायामाचे महत्त्व याविषयीही मार्गदर्शन केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यपूर्ण भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण :-

किशोरवय हा व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि आयुष्याला योग्य दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात योग्य आरोग्यविषयक माहिती, सुरक्षिततेची जाणीव आणि चांगल्या सवयी विकसित होणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून श्री. पुरुषोत्तम घ्यार, समुपदेशक, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम (RKSK), ग्रामीण रुग्णालय चामोर्शी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालय प्रशासनाने आवश्यक बैठक व्यवस्था व इतर तयारी करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular