VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी,१८-०१-२०२४::- जमीन अधिग्रहण विरोधी संयुक्त संघर्ष समन्वय कृती समिती यांच्या वतीने गुरुवारी १८ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या उपजाऊ जमिनी भांडवलराच्या घशात घालण्याच्या षडयंत्राविरोधात शेतकऱ्यांचां हजारोच्या संख्येने आसूड मोर्चा “जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची” अशा घोषणा देत उपविभागीय अधिकारी कार्यालय कचेरीवर धडकला.
“शेतकऱ्यांचा भव्य आसूड मोर्चाची सुरुवात घोट क्रॉसिंग येनापूर रोड पासून ते लक्ष्मी गेट समोरच्याजुन्या तहसील रोडने एसडिओ कार्यालयापर्यंत लांबच लांब हजारोच्या संख्येने महामोर्चा होता. शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावल्यास तुमचे हात कलम केले जातील असे आपल्या सैन्याला बजावून सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी खासगी भांडवलदारांना नफा करवून देण्यासाठी शेतक-यांकडून काढून घेतल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या मालकी हकाच्या जमीनी शासन काढून घेऊन त्यांच्या येणाऱ्या पिढ्या नष्ट करण्याचा डाव शासनाने आखलेला आहे.सुरुवातीला कोनसरी या गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी खोटी आश्वासने देऊन लबाडीने त्यांच्याकडून काढून घेतल्या त्याच रोजगार निर्मितीची गुलाबी स्वप्ने दाखवून त्यांना कामगार बनवून त्यांचे शोषण करायला सुरुवात केली. आता कंपनीच्या वाढीसाठी कंपनीच्या सरकारला अतिरिक्त जमिनीची आवश्यकता पडली असतांना शासनाने कोनसरी, मुधोली चक नं. २, सोमनपल्ली, जैरामपूर, मुधोली चक नं. १, पारडी देव या परिसरातील शेतकऱ्यांच्या हकाच्या उपजाऊ १०० हेक्टर आर जमिनी काढून घेण्याचा फतवा शासन दरबारातून काढला.
“भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी” या म्हणीप्रमाणे कंपनीने शेतकऱ्यांची उपजाऊ जमीन गिळकृत करण्याचा घाट सुरु केलेला आहे. पहिल्या टप्प्यात वरील ६ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.आजपर्यंत वैनगंगा नदीच्या खोऱ्यात सुपीक जमीनीत शेती करुन सुजलाम् सुफलाम् असलेला शेतकरी देशोधडीला निघून कामगाराच्या रुपात गुलाम होण्याकडे वाटचाल सुरु झालेली दिसत आहे. कालपर्यंत स्वतःच्या शेतात राजा असलेल्या शेतकन्याला गुलाम बनवून, लाचारित ढकलण्याचा डाव शासनाचा हाणून पाडण्यासाठी तालुक्यातील हरणघाट, पुलापासून ते चामोर्शी, रेगडी, कंसोबा मार्कंडा ते आष्टी या परिसरातल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी बाचवून आपला भविष्य अंध:कारात जाण्यापासून वाचविण्यासाठी शेतकरी शेतकरी मोर्चात उपस्थित होते.
“मोर्चातील या आहेत प्रमुख मागण्या”
कोनसरी, मुधोली चक नं. २, मुधोली चक नं. १, जैरामपूर, सोमनपल्ली, पारडी देव या गावातील जमीन हस्तांतरणाचा आदेश तात्काळ रद्द करावा.,लायड मेटल कंपनीच्या कोनसरी येथील प्रकल्पाकरीता जमीन देणाऱ्या भुमिधारकांना त्यांच्या हष्काची दुसरी शिट तात्काळ घेण्यात यावी.,कोनसरी येथील लोहप्रकल्पाचा विस्तार करु नये., कोनसरी परिसरासह चामोर्शी तालुक्यात होण्याच्या हवेच्या प्रदुषणावर तात्काळ नियंत्रण आणून उपयोजना करावी.जिल्हाधिकारी वारंवार लोकशाही देशातल्या लोकांच्या भाषण अभिव्यक्ती सभा घेणे, आंदोलन करणे, असलेला संबिधानाने दिलेला मूलभूत अधिकार काढून घेणारा आयपीसीचा १४४ कलमाचा धाक दाखवू नये. चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना विज पुरवठा नियमित व सुरळीत करावा. ,शेतकऱ्यांच्या शेतीसह गावांचे विस्थापन करण्याचे आदेश रद्द करावे.,शेतकऱ्यांशी शासनाने सार्वजनिक चर्चा करुनच जमीनीचे व्यवहार करावे. आदींसाठी महामोर्चा काढण्यात आला मोर्चा उपविभागिय कार्यालयावर धडकला त्यावेळी तहसीलदार प्रशांत घोरुडे व उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे तहसीलदार दिपक जगताप यांना निकेश गद्देवार, श्रीकांत पावडे, उपसरपंच रतन अक्केवर, सरपंच्य. अश्विनी कुमरे किशोर खमनकर दिपली सोयामम, छाया भोयर, नीलकंठ नीखडे, प्रमोद भगत,रमेश कोडापे, हरीश निखाडे, फकिरा ठेंगणे, विठ्ठल पोतरजवार, चंद्रकांत बोंगिरवार आदी
निवेदन देण्यात आल्यानंतर मोर्चाला उपस्थित शेतकऱ्यांना काँग्रेसचे रमेश कोडापे, सामाजिक कार्यकर्ते फकिरा ठेंगणे , राष्ट्रीय किसान सभेचे अमोल मांरकवार, आम आदमी पार्टीचे बाळकृष्ण सावसागडे, रमेश मडावी, काँग्रेसचे डॉ. किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, विद्या कष्टी , बाजार समिती संचालक अमोल गाण्यारपवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी शेतकऱ्याच्या या लढ्याला पाठिंबा देत जमिनी हडप करू देणार नसल्याचे मार्गदर्शनात सांगितले .यावेळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता.
