VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी,२५-०१-२०२४::- वैनगंगा नदीच्या पाण्यात नाव उलटून सहा महिलांना जलसमाधी मिळाल्याची दुदैवी घटना दिनांक 23 जानेवारी मंगळवारी सकाळी ११.०० वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गणपुर रै नदीवर घडली होती.
या घटनेमुळे संपूर्ण गणपुर (रै) गावात शोककडा पसरली असून ही घटना संपूर्ण जिल्ह्यात बहुतर्चित ठरली.
(मृतकात येथील )
१)जिजाबाई दादाजी राऊत,२)पुष्पा मुक्तेश्वर झाडे,३) रेवता हरिचंद्र झाडे, ४)मायाबाई अशोक राऊत,५)सुषमा सचिन राऊत,६)बुधाबाई देवाजी राऊत सर्व रा. गणपूर रै.
रा. गणपूर ता. चामोर्शी असे जलसमाधी मिळालेल्या महिलेचे नाव आहे, यापैकी तीघांचे प्रेत मिळाले असुन त्यात
(मिळालेले प्रेत)
१) पुष्पाबाई मुक्तेश्वर झाडे,२)रेवंता हरीचंद्र झाडे,३) जिजाबाई दादाजी राऊत,सर्व रा. गणपूर रै.
गणपुर (रै) येथील दुर्देवी घटनेनंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात शासकीय मदत म्हणून नैसर्गिक आपत्ती निधीतून मिळालेल्या प्रेतांच्या तीन कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपये धनादेश वाटप चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत गोरुडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी सरपंच सुधाकर गद्दे, उपसरपंच जीवन भोयर, माजी पंचायत समिती सदस्य परसोडे, मंडळ अधिकारी नवनाथ अतकरे, तलाठी सुधीर बाविस्कर, कोतवाल मंगेश पेंदोर व गावातील नागरिक उपस्थित होते.
अजून पर्यंत तीन मृतक महिलेंचे प्रेत मिळाले नसून त्यांचा शोध घेणे वेगाने सुरू आहे. अशी माहिती चामोर्शीचे तहसीलदार यांनी वैनगंगा न्यूज 24 च्या संपादकांना दिली.
