VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी,२५-०१-२०२४::-२३ जानेवारी २०२४ रोजी चामोर्शी तालुक्यातील गणपुर (रै) जवळील नदी घाटावर चंद्रपूर जिल्ह्यात मिरची तोडण्यासाठी डोंग्याने नदी पार करून जात असताना ६ महिलांच्या जीवावर बेतले , वैनगंगा नदीत त्यांच्या नाव उलटुन ६ महिलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.
त्यामुळे संपूर्ण गणपुर (रै) गावावर शोककळा पसरली आहे. मृतकात येथील
१) पुष्पाबाई मुक्तेश्वर झाडे,
२) रेवंता हरिश्चंद्र झाडे,
३) जिजाबाई दादाजी राऊत यांचे प्रेत अगोदर मिळाली होते. आता पुन्हा सुषमा सचिन राऊत हिचे प्रेत मिळाले असून आणखी दोघांचे प्रेत शोधन्या करिता शोध मोहीम सुरू आहे.
