VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील विविध मुख्य विकास कामांची केली पाहणी.
गडचिरोली,१३-०२-२०२४::-गडचिरोली जिल्हा केंद्रावर आपण प्रयत्न करून कोट्यावधी रुपयांची विकास कामे आणली असून जिल्हा केंद्रावरील विकासकामां साठी आपण कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली जिल्हा मुख्यालयी असणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रमुख विकास कामांची पाहणी करताना केली.
यावेळी त्यांनी विभागीय बस परिवहन कार्यालयाचे बांधकाम, जिल्हा क्रीडा संकुलाचे बांधकाम, महिला रुग्णालयाचे वाढीव बांधकाम तसेच आदिवासी जात पडताळणी कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी केली. व संबंधित कामे विहित कालावधीत्व दिलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे तातडीने पूर्ण करावीत असे निर्देश दिले.
याप्रसंगी संबंधित विभागाचे अधिकारी ,कर्मचारी , अभियंते यांचे सह भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे कृ. उ . बा.समितीचे संचालक हेमंत बोरकुटे, शक्ती केंद्रप्रमुख राजू शेरकी, उपस्थित होते.
