VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
राज्यातील गरीब, कामगार,मजूर, शेतकरी,सर्वसामान्य, उद्योगी अशा सर्वच वर्गाचा अर्थसंकल्पात समावेश.
गडचिरोली, २७ फेब्रुवारी २०२४::-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजितदादा पवार यांनी विधानसभेत मांडलेला अर्थसंकल्प हा राज्याच्या विकासाला गती देणारा आहे.
या अर्थसंकल्पात राज्यातील गरीब,कामगार, मजूर,शेतकरी,सर्वसामान्य,उद्योगी अशा सर्वच वर्गाच्या हिताचा विचार करण्यात आला आहे.* *विकसीत भारताच्या संकल्पनेला गती देणारा जन कल्याणकारी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ना.अजित दादा पवार यांचे अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया आमदार डॉ देवरावजी होळी यांनी या अर्थसंकल्पावर दिली.
