VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
विविध चॅम्पियनशिप स्पर्धे मध्ये केले राजनगरी अहेरीचे नावलौकिक.
गडचिरोली/अहेरी,२७ फेब्रुवारी२०२४::- येथील स्थानिक राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने कराटे,फाईट आणि उशु चॅम्पियनशिप मध्ये सहभाग घेतला होता.चॅम्पियनशिप मध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत मेडल प्राप्त करून राजनगरी अहेरीसह गडचिरोली जिल्ह्याचं नावलौकीक केलं.
२०२३-२४ च्या महाराष्ट्र कराटे ऑलिम्पिक मध्ये यासिन फिरोज अली सय्यद,अमोल पुरोहित,युवराज अंबाघरे यांच्या टीम ला गोल्डमेडल मिळाले.तर
२०२३-२४ टीम फाईट यासीन अली,प्रथम कोरेत,युवराज अंबाघरे,रभुष्र,अमोल पुरोहित यांना सिल्वर मेडल मिळाले.
तसेच २०२४ ऑल इंडिया उशू चॅम्पियनशिप ही स्पर्धा कश्मीर मध्ये खेळण्यात आली.त्यात राजनगरी अहेरी येथील विद्यार्थी कु.यश पडालवार यांनी गोल्ड मेडल खेचून आणले.त्यामुळे या सर्व खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
हे सर्व खेळाडू राजनगरी अहेरी चे सुपुत्र आहेत.ही बाब माहीत होताच माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी सर्व खेळाडूंना राजमहाल येथे बोलावून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले.आणि पुढे सुद्धा असेच खेळत राहा व आपल्या क्षेत्राचे नाव मोठे करा असे म्हणत सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अहेरी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते,स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
