Monday, September 14, 2026
HomeGadchiroliमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नावर सन्मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम,मा.शिक्षणाधिकारी...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षकांच्या ज्वलंत प्रश्नावर सन्मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम,मा.शिक्षणाधिकारी साहेब तथा मा.मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी साहेब यांचेशी भेट व चर्चा…

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गडचिरोली.

गडचिरोली, ०१ मार्च २०२४::- २९ फेब्रुवारी २०२४ ला गडचिरोली जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित 407 प्राथमिक शिक्षकांना ब-याच कालखंडानंतर निवडश्रेणी मंजुरी,केंद्रप्रमुख पदोन्नती,उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नती,विस्तार अधिकारी शिक्षण पदोन्नती प्रक्रिया मार्गी लावल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने सन्मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह मॅडम तसेच मा. श्री. विवेक नाकाडे साहेब शिक्षणाधिकारी ( प्राथ.) यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत आभार मानले.तसेच उर्वरित प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

“निवेदनात प्रामुख्याने मागण्या पुढील प्रमाणे”    १) जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा 1 तारखेला करण्यात यावे.

२) भाषा/समाजशास्त्र/गणित -विज्ञान पदवीधर शिक्षक पदोन्नती व विषय शिक्षक पदोन्नती त्वरित करणे.

३) बांगला भाषिक शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरणे.

) सहायक शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरणे. ५)आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना‌ एक आगाऊ वेतनवाढ देणे. ‌

६) १ वर्षापुर्वी बंद करण्यात आलेली अतिरिक्त घरभाडे भत्ता टॅब पुर्ववत सुरू करणे.

७) बी.एल.ओ.व ईतर अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून काढून घेणे. 

८) जि..पि.एफ.परतावा/ना-परतावा प्रकरणे त्वरित निकाली काढणे. 

९) बांगला भाषिक शाळेतील विद्यार्थ्यांना बांगला भाषिक स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करुन देणे.

१०) सन 2014-15 मधील उर्वरित स्वच्छता गृह बांधकामांची रक्कम अदा करणे.

११)उर्वरित वरिष्ठश्रेणी, निवडश्रेणी चे प्रस्ताव मागवुन ते मंजूर करणे.

१२) संयुक्त शाळा अनुदानाची उर्वरित रक्कम त्वरित अदा करणे.

१३) अर्जित रजेचे अर्ज प्राप्त झाल्या बरोबर रजा मंजुर करून वेतन काढण्यासाठीचे निर्देश गटशिक्षणाधिकारी यांना देणे. ‌

१४) सेवा निवृत्त शिक्षकांच्या सर्व प्रकारच्या थकबाकी अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे.

१५) मयत शिक्षकांच्या पेन्शन केस त्वरित मंजूर करणे.

१६) 4 टक्के सादील अनुदान जिल्हा परिषद शाळांना त्वरित अदा करणे.

     याबाबत निवेदन देऊन वरील मुद्दे निहाय सविस्तर चर्चा केली.वरील सर्व समस्यां निकाली काढण्याबाबत वरिष्ठांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे *जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर*, *जिल्हा कार्याध्यक्ष श्री राजेश चिलमवार*,जिल्हा सल्लागार श्री जनार्दन म्हशाखेत्री,जिल्हा उपाध्यक्ष श्री लोमेश उंदिरवाडे, चामोर्शी तालुका सल्लागार श्री सुनिल सातपुते आदी शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular