VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
खरपुंडी येते कबड्डी स्पर्धेचा समरोप ; जपतलाई संघ विजेता.
गडचिरोली/खरपुंडी, ०२ मार्च २०२४::- आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द आणि चिकाटी ठेवून सातत्याने संघर्ष करा असा मुलमंत्र गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित युवकांना दिले.
गडचिरोली तालुक्यातील मौजा खरपुंडी येते कबड्डी स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले सद्याचा काळ हा संघर्षाचा आहे. सहज आणि आयते कोणालाच मिळत नाही, क्षेत्र कोणतेही असले तरी स्पर्धेत टिकायचे असल्यास सातत्याने प्रयत्न करावेच लागेल. आयुष्यात यश अपयश मिळत असते मात्र अपयशाला खचून न जाता, परत जिद्दीने पुढील कार्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
खरपुंडी विरुद्ध जपतलाई संघात झालेल्या अंतिम सामन्यात जपतलाई संघ प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला. विजेत्या संघाला रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, माजी नगरसेवक रमेश चौधरी, ढिवरू मेश्राम, सुधीर बांबोळे, जेष्ठ नाटककार राज ठाकरे, कमलेश खोब्रागडे सह मोठ्या संख्येने मान्यवर, सहभागी खेळाडू आणि गावातील क्रीडाप्रेमी युवक, महिला, पुरुष उपस्थित होते.
