Tuesday, July 28, 2026
HomeAshti"दुर्दैवी घटना" महाशिवरात्री निमित्त बंदोबस्ता साठी तैनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने...

“दुर्दैवी घटना” महाशिवरात्री निमित्त बंदोबस्ता साठी तैनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

 गडचिरोली/आष्टी,०९ मार्च २०२४::- पोलीस दलातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथे महाशिवरात्री निमित्त आयोजीत यात्रेकरता बंदोबस्तासाठी तैनात सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे कर्तव्यावर असताना मृत्यु झाल्याची घटना दिनांक ८ मार्चला सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास घडली. भैय्याजी पत्रू नैताम वय ५२ वर्ष सहायक पोलीस उपनिरीक्षक कोपरल्ली ता. मुलचेरा असे मृत पोलिस शिपायाचे नाव आहे.

उपपोलीस स्टेशन राजाराम खांदला येथे कर्तव्यावर असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक भैय्याजी नैताम रा. मुलचेरा, कोपरल्ली यांना चपराळा येथील महाशिवरात्री यात्रेत बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते. ८ मार्चला ४.१५ वाजताच्या सुमारास यात्रेत कर्तव्यावर असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली त्यांना त्वरित आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

   घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस करीत आहेत. मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून पार्थीव त्यांच्या मूळ गावी कोपरल्ली येथे पाठविण्यात येणार आहे. मृत सहायक पोलीस उपनिरीक्षकाच्या मागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular