Tuesday, October 6, 2026
HomeAshtiसुभाषग्रामात वन्यप्राणी शिकारीचा डाव उधळला; दोघे वनविभागाच्या ताब्यात...

सुभाषग्रामात वन्यप्राणी शिकारीचा डाव उधळला; दोघे वनविभागाच्या ताब्यात…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल; शिकारीच्या साखळीचा शोध सुरू,

आष्टी, 06 ऑक्टोबर 2026::-

आलापल्ली वनविभागांतर्गत मार्कंडा (कं.) वनपरिक्षेत्रातील गुंडापल्ली उपक्षेत्राच्या बहादूरपूर नियतक्षेत्रातील सुभाषग्राम येथे वन्यप्राण्यांच्या अवैध शिकारीविरोधात वनविभागाने धडक कारवाई केली. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाषग्राम परिसरात वन्यप्राण्यांची अवैध शिकार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने संशयित हालचालींवर लक्ष ठेवत कारवाई केली. या कारवाईदरम्यान निर्मल ढाली, रा. सुभाषग्राम आणि विश्वजीत रविंद्र राय, रा. तुमडी यांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची वनविभागाकडून कसून चौकशी सुरू आहे. या शिकारीच्या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच वन्यप्राण्यांची शिकार, वाहतूक अथवा तस्करीशी संबंधित मोठी साखळी कार्यरत आहे का, याचा शोध वनविभाग घेत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :-

ही कारवाई उपवनसंरक्षक शैलेश मीना व सहायक वनसंरक्षक मोहम्मद आजाद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी टी. एम. मोढळे (मार्कंडा कं.), क्षेत्र सहाय्यक आर. एल. बानोत, वनरक्षक एस. जी. राठोड, एन. डी. सोनवणे, सुनील खेत्रागाडे व बी. के. लिंपटे यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

वन्यजीवांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी वनविभागाकडून परिसरात गस्त आणि तपासणी वाढविण्यात आली आहे. वन्यप्राण्यांची अवैध शिकार, तस्करी किंवा वन्यजीवांशी संबंधित कोणतीही बेकायदेशीर कृती आढळल्यास संबंधितांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वनविभागाने दिला आहे.

वन्यजीव व वनसंपदेच्या संरक्षणासाठी नागरिकांनी संशयास्पद हालचाली अथवा शिकारीसंदर्भातील माहिती तातडीने वनविभागाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular