VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
40 रक्तदात्यांनी केले रक्तदान.
गडचिरोली/चामोर्शी, २४ मार्च २०२४::- लखमापूर बोरी इथे मागील 8 वर्षापासुन कुठली जयंती उत्सवासारखे दिनविशेष असो वा नसो, मागील 8 वर्षापासुन उन्हाळ्याच्या सुरुवातीला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
मार्च, एप्रिल ते मे या काळात शाळा, महाविद्यालयांत परीक्षा व सुट्या आणि बहुतांशी नागरिक उन्हाळ्यात सुट्यांमध्ये परगावी जात असल्याने शिबिरे राबवताना अडचणी येतात. त्यातच या काळात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने जिल्हा रक्तपेढीमध्ये अतिरिक्त रक्तपुरवठा करावा लागतो. या स्थितीवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन नेहरू युवा केंद्र प्रेरित शिवछत्रपती युवक मंडळ लखमापूर बोरी चे अध्यक्ष दिलखुश बोदलकर यांच्या वतीने करण्यात आले होते. त्याअनुषंगाने 23 मार्च शनिवार ला रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
हिवाळा आणि पावसाळ्यात या शिबिरांना पुरेसा प्रतिसाद मिळत असतो मात्र मार्चमध्ये वाढत्या उन्हात रक्तदान करणे धोक्याचे आहे असे सामान्य दात्यांमध्ये रक्तदानाबद्दल गैरसमजुत असल्याने त्यांनी शिबिरांकडे पाठ फिरविली आहे.
मात्र हे सर्व समज चुकीचे असून उन्हाळ्यात रक्तदान करण्याने शरीरास कोणताही तोटा होत नसते असे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.श्रीतमा मुखर्जी यांनी स्पष्ट केले.
यावेळी रक्तदात्यांमध्येरक्तदानासाठी अमन कैलास बोदलकर, दिलखुश बोदलकर, अमोल बोदलकर, सौदागर मेश्राम, मयूर लाड (कळमगाव), कुणाल तुंबडे, क्रांती तुंबडे, दुशांत भगत, दुशांत लाड, अनिल आक्रेडवार (रामसागर), शुभम मुत्तेवार, सोहन येंचीलवार, उमाजी भोयर, गोपीचंद बारसागडे, महेश काटवे, श्रीकृष्ण वैरागडे, रोशन बोरीकर, श्रीकांत वैरागडे, रुपेश तुंबडे, तामदेव सातपुते, दीपक झबाडे (भिक्षी), गोमेश्वर बदखल (शिक्षक जि.प. लख.बोरी), अंकुश शेंडे, इर्शादअल्ली सय्यद, किशोर गेडाम, विजय भोयर, दत्तू सत्तरवार, अमोल वैरागडे, आकाश कोसरे, अतिश पीपरे, चंद्रभान सोनटक्के, विनोद क.भोयर, कृष्णा बारसागडे, अमित शेंडे, सारंग जुवारे, विशाल पीपरे इ. युवकांनी रक्तदान करून समाजहिताचे सहकार्य केले.
यशस्वीतेसाठी जिल्हा स्वयं रक्तदाता समिती गडचिरोली चे अध्यक्ष चारुदत्त राऊत व उपाध्यक्ष निशिकांत नैताम हे नियमित युवकांना रक्तदानासाठी व शिबीर आयोजित करण्यासाठी प्रोत्साहीत करीत असून गरजेच्या वेळेस रुग्णांना रक्त पुरवून खूप मोलाचे सहकार्य करीत असतात. तसेच सक्षम बहूउद्देशीय संस्था गडचिरोली चे कल्याणी गायकवाड यांनी रक्तदात्याला केळी बिस्केट देऊन सहकार्य केले. तसेच जिल्हा रक्तपेढी मधील डॉ. श्रीतमा मुखर्जी, निलेश सोनवाने,प्रणय मलोडे,गणेश साळवे, प्रमोद देशमुख व प्राथ. आरोग्य केंद्र लख. बोरी येथील कर्मचारी आदींनी सहकार्य केले.
