VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/आष्टी,०१ एफ्रिल २०२४::- महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार अशोक जी नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांनी आष्टी येथील श्रीराम मंदिरात जनतेच्या समस्या बाबत ग्रामस्थांनाची भेट घेऊन चर्चा केली.या बैठकी दरम्यान आष्टी या शहरातील समस्या जाणुन घेऊन रुग्णसेवांसाठी देण्यात येणारी ॲम्बुलन्स यांचा सुद्धा विचार करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला जाईल. असे या बैठकी दरम्यान खा.नेते यांनी आश्वासित केले.
यावेळी या बैठकीत खा.नेते यांनी बोलतांना म्हणाले मला सेवा करण्यासाठी तिसऱ्यांदा विजय करा.यासाठी सर्व जनतेचे सहकार्य,व साथ हवी या विजयासाठी कार्यकर्ता यांनी कामाला लागावे. व प्रभावीपणे काम करावे.याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात केलेला कार्याची माहिती देत बैठकीला खा.अशोक नेते यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
आमदार डॉ. देवराव होळी यांनी बैठकीत बोलतांना तिसऱ्यांदा नेते साहेबांना बहुमताने विजयी करा असे सुचक व्यक्तव्य यावेळी केले.
या बैठकीला प्रामुख्याने जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,अरूनजी हरडे,नंदुजी काबरा,तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर,जिल्हा सचिव दिलीप चलाख, भाजपा नेते संजयजी पंदिलवार,जैराम चलाख,धर्मप्रकाश कुकुडपवार, किरणापुरे जी, विनोद गौरकर, प्रभूदास खोब्रागडे, खरकडे साहेब,तसेच नागरिक जनता व पदाधिकारी उपस्थित होते.
