Saturday, May 23, 2026
HomeAshtiगेल्या काही महिन्यापासून आष्टी परिसरात अवैध रेती वाहतूक करण्याचा धुमाकूळ...

गेल्या काही महिन्यापासून आष्टी परिसरात अवैध रेती वाहतूक करण्याचा धुमाकूळ…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी 

आष्टी महसूल कार्यालय मात्र वाऱ्यावर,रेती तस्कर बनले गब्बर.

आष्टीत अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला,

मात्र कारवाई न करता पोलीस स्टेशन येथे ठेवण्यात आला.

गडचिरोली/आष्टी,०२ मे २०२४::- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील वैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा रोज चालू असतो मात्र बुधवारी १ मे २०२४ रोजी सकाळी महसूल विभागांनी कितीतरी दिवसा नंतर आष्टीत अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडला आहे. सदर ट्रॅक्टरला नंबर नसून ही अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे ( शिंदे गट) यांच्या मालकीची असून आष्टी पोलीस स्टेशन परिसरामध्ये या मिळाली ती ट्रॅक्टर पोलिस स्टेशन आष्टी येथे ठेवण्यात आला आहे. सदर कारवाई बद्दल माहिती 

तहसीलदार प्रशांत घोरुडे चामोर्शी यांना दुरध्वनी द्वारे संपर्क साधला असता आमच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेतीने भरलेला ट्रॅक्टर पकडली आहे. व पंचनामा करून पोलिस स्टेशन आष्टी ठेवण्यात आला. काल सुट्टी असल्याने कारवाई होऊ शकली मात्र ट्रॅक्टर चालक सुरेश व मालकाचे नाव विचारले असता राकेश बेलसरे असे आहे. शोकांतिका ही आहे आष्टी शहरांमध्ये महसूल मंडल कार्यालय असून सुद्धा अवैध रेती वाहतूक दिवस रात्र सुरू असते तर यांना अभय कुणाचे अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

    आश्चर्याची बाब ही आहे या भागात महसूल विभागामार्फत पथक नेमणूक केले असल्यानंतरही या रोज अवैध रेती उत्खनन केली कशी जाते. मग या पथकांना अधिकाऱ्यांची /पॉलिटिकल लोकांची भीती तर नाहिंना अशी चर्चा जनसामान्य लोकात आहे. 

 तालुक्यातील वैनगंगा नदी घाटा मध्ये सध्या वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करून कहर केला जात आहे. मात्र प्रशासनाकडून अधून मधून थातुर मातुर होणाऱ्या कारवाईने रेती माफियांना वचक बसनार का असा प्रश्न जनतेत उपस्थित होत आहे.या एका कारवाईने रेती तस्करावर वचक बसेल का ? यावर प्रशासन ठोस पावले उचलून रेती तस्करावर पाहिजे तशी कारवाई महसूल विभागाकडून व्हायला पाहिजे असे नागरिकांत चर्चा आहे या भागातील करोडो रुपयाचे महसूल बुडत आहे याचं काय कर्मचारी ,अधिकारी तर आपला पगार महिन्याला तर घेतातच मग अवैध रेती उत्खनन करणारे यांच्यावर लक्ष्य कोण देणार. ही एका कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणल्याचा प्रयत्न केला जात असला तरी होणाऱ्या कारवाईचा गब्बर वाळू माफियांना काहीच फरक पडत नसल्याचे बोलले जात आहे. बुधवार एक मे रोजी सकाळच्या सुमारास महसूल विभागाच्या नायब तहसीलदार जाधव नार्देलवार यांनी तालुक्यातील आष्टी परिसरात पथका सोबत आले असताना एक ट्रॅक्टर बिना नंबर चे ट्रॅक्टर अवैध वाळू सह त्यांच्या निदर्शनास आले,

यावेळी सदरील ट्रॅक्टर जप्त करत पुढील कारवाईसाठी पोलिस स्टेशन आष्टी येथे आणून ठेवण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्याचा प्रस्ताव दाखल केला जाणार असल्याचे यावेळी महसूल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

मात्र कित्येक महिन्या भरापासून या परिसरात दिवस रात्र दरम्यान इल्लूर , ठाकरी,कुनघाडा, कढोली, इत्यादी ठिकाणी वैनगंगा नदी पात्रामधून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा चालू असुन सुद्धा प्रशासनाने नायब तहसीलदार कावडे यांच्यासोबत पथक नेमणूक केले असून कारवाई कडे दुर्लक्ष का करीत असतात. आतातरी महसूल विभागाचे अधिकारी याकडे पूर्णता लक्ष देईल का आणि अवैध रेती उत्खनन करणाऱ्या गब्बराच्या मुस्क्या आवरतील का ? अशी आष्टी परिसरात नागरिकांत चर्चा होत आहे.

विना नंबरचे ट्रॅक्टरने रात्रंदिवस वाहतूक करीत असतात तर हे स्थानिक महसूल विभाग आष्टी यांना दिसून येत नाही का असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. अवैध रेती वाहतूक करणारा हा ट्रॅक्टर कुनाच्या मालकीचा आहे. हा कुतुहलाचा विषय आहे. त्या मालकावर खरच कारवाई करण्यात येणार काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular