VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/चामोर्शी, ०६ जून २०२४::- नगरपंचायत चामोर्शी व सक्षम बहुद्देशीय संस्था गडचिरोली यांच्या संयुक विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण व मास्क वितरित करण्यात आले.
पर्यावरण सुरक्षित ठेवण्याकरीता पर्यावरणाची स्वछता करणे त्याचे संरक्षण व संवर्धन करणे सर्व नागरीकांचे कर्तव्य आहे पर्यावरण व प्रदूषणासंधर्भात शासन जे वेगवेगळे उपक्रम राबवतात त्यात त्यांना सहकार्य करुन त्याचा आदर करायला हवा.पर्यावरण सुरक्षित ठेवण्याकरीता झाडे लावा झाडे जगवा,ई .वाहनाचा व सायकलचा वापर करा,पाण्याचा जपून वापर करावा,घंटा गाडीमध्ये कचरा टाकतांना ओला,सुका,सेनीटरी व घातक कचरा वेगवेगळा करावा.
यावेळी स्वछता कामगार यांनी आरोग्य जपावे अशी शुभेच्छा देन्यात आली.
कार्यक्रमाला कर अधिकारी भारत वासेकर ,शहर प्रमुख अल्केश बनसोड,पाणीपुरवठा अभियंता श्री.स्वप्निल पिदुरकर,संस्थेच्या सदस्या कल्याणी गायकवाड,रुशी गोरडवार,स्वछता कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते
