Saturday, May 23, 2026
HomeGadchiroli१ जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन...

१ जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी 

गडचिरोली,२७ जून २०२४::- माहे जुलै महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार दिनांक 1 जुलै 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात येणार आहे.

  सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यत राहील आणि सभेला 3.00 वाजता सुरुवात होईल, ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर दिनांक 1 जुलै 2024 रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र-1 अ ते 1 ड) दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहील. तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. असे निवासी उपजिल्हाधिकारी विवेक सोळूंके यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular