VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी
गडचिरोली,२१ जुलै २०२४::-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत मात्र जिह्याकडे लक्ष द्यायला त्यांना अजिबात वेळ नाही अशी स्थिती आहे.. जिल्हा अनेक समस्यांनी ग्रस्त आहे आरोग्य व्यवस्था रामभरोसे आहे.. डॉक्टरांच्या रिक्तपदाअभावी दुर्गम भागातील रुग्णांची हेळसांड होत आहे.. पावसाळा सुरु झाला तरी रस्त्यांची, नाल्यावरील पुलांची कामे अर्धवट आहे त्यामुळे शाळकरी मुले, रुग्ण, गरोदर स्त्रिया व प्रवाशांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालुन पुराच्या पाण्यातून ये जा करावी लागत आहे. अपुऱ्या व भंगार बसेसमुळे प्रवाशी त्रस्त आहेत. बसअभावी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होण्याची वेळ आली आहे. पावसाळयात बसेस मध्ये पाण्याची गळती होत असल्याने नागरीक त्रस्त आहेत. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. जिह्यातील उद्योगात स्थानिक बेरोजगार युवकांना डावलून परप्रांतीय व पर जिह्यातील युवकांना प्रथम प्राधान्य देत असल्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार यूवक हताश झाला आहे. रस्ते खड्डेमय झाले आहेत मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा विकासाकडे वाटचाल करत असल्याच्या पोकळ गप्पा मारत आहे त्यांना जिह्यातील समस्या सोडविण्यात रस नसून केवळ लोहखाणीत स्वारस्य आहे.. देवेंद्र फडणवीस हे निष्क्रिय पालकमंत्री असुन त्यांना जिह्यातील प्रश्न सोडविण्यासाठी वेळ मिळत नसेल तर त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडावे.
ही न्यायव्यवस्था काही कांची रखेल झाली,
ही संसद देखील सरकारची हवेली झाली,,
सर्व सामान्य माणसांच्या व्यथा मांडू कुणाकडे,
कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली,,
