Friday, September 18, 2026
HomeGadchiroli"BREAKING NEWS" शिवनी नदीजवळ बस पलटली; गडचिरोली–चामोर्शी मार्गावर अपघात...

“BREAKING NEWS” शिवनी नदीजवळ बस पलटली; गडचिरोली–चामोर्शी मार्गावर अपघात…

VAINGANGA NEWS4/ विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली, 18 सप्टेंबर 2026::-गडचिरोली–चामोर्शी मार्गावर शिवनी नदीजवळ बस पलटून अपघात झाल्याची घटना शुक्रवारी घडली. भरधाव मार्गावर अचानक बस पलटल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिवनी नदीजवळ बसचा अपघात झाला असून बस रस्त्यावर पलटी झाली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. तसेच संबंधित यंत्रणेला याबाबत माहिती देण्यात आली. अपघातातील प्रवाशांची स्थिती, जखमींची संख्या तसेच संभाव्य जीवितहानीबाबत अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.

दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. अपघाताबाबत अधिक माहिती समोर आल्यानंतर पुढील वृत्त प्रसिद्ध करण्यात येईल.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular