Saturday, September 19, 2026
HomeGadchiroliभक्तीमय वातावरणात डॉ. देवराव होळी यांनी घेतले गणरायाचे व महालक्ष्मीचे दर्शन...

भक्तीमय वातावरणात डॉ. देवराव होळी यांनी घेतले गणरायाचे व महालक्ष्मीचे दर्शन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

रामनगरातील घरगुती गणेशोत्सवाला भेट; मुरखळा येथे महालक्ष्मीची पूजा-अर्चना करून भाविकांना दिल्या शुभेच्छा,

गडचिरोली, 19 सप्टेंबर 2026::- गणेशोत्सव आणि महालक्ष्मी उत्सवाच्या निमित्ताने गडचिरोली शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी शहरातील रामनगर परिसरातील विविध घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले. तसेच मुरखळा येथे महालक्ष्मीचे दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली.

यावेळी डॉ. देवराव होळी यांनी रामनगर परिसरातील अरुण हरडे, संजय बारापात्रे, योगिता भांडेकर, कविता उरकुडे, कुणाल पेंदोरकर, राजेश जंगावार आणि सुरज गुड्डमवर यांच्या निवासस्थानी आयोजित गणेशोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

त्यानंतर मुरखळा येथील अरुण कल्लेवार यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा-अर्चना केली. या धार्मिक भेटीदरम्यान त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत गणेशोत्सव व महालक्ष्मी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो, अशी सदिच्छा डॉ. देवराव होळी यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या या भेटीमुळे परिसरातील गणेशभक्त आणि भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular