VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
नगरपंचायतील पदाधिकारीयांचा चक्काजाम करून आंदोलनाचा इशारा,
गडचिरोली/एटापल्ली, २८ जुलै २०२४::- शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा ईशारा नगराध्यक्षा दीपयंती पेंदाम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आलापल्ली येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदनातून दिला आहे.
खड्डे पडलेले असल्यामुळे येथिल जनतेला वाहतुक व दळणवळण करणेकरिता तसेच सामान्य जनतेला रहदारीकरिता मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तेथिल मुख्य रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्याकरिता यापुर्वी सुचविण्यात आले होते. परंतु याबाबत गंभीर दखल घेतलेली नाही.
कंत्राटदारांनी सदर मुख्य रस्त्यावरील तात्पुरते खड्डे बुजविलेले होते. परंतु सदर खड्डे पुन्हा जैसे थे आहेत. कंत्राटरांच्या – थातूरमातूर कामामुळे जनतेला व – रहदारीला खुप त्रास होत आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायत एटापल्ली हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथिल मुख्य रस्त्यावर मोठमोठे बुजविलेले होते. परंतु सदर खड्डे पुन्हा जैसे थे आहेत. कंत्राटरांच्या – थातूरमातूर कामामुळे जनतेला व – रहदारीला खुप त्रास होत आहे.
तसेच सद्या पावसाळयाचे दिवस असून सदर मुख्य रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यामुळे अपघात . होउन जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर मुख्य रस्त्याच्या बांधकामाबाबत येत्या ७ दिवसात गांभीर्याने दखल न घेतल्यास चक्का जाम आंदोलन करुन वृक्ष लावण्यात येईल असाही ईशारा देण्यात आला आहे. यावेळी निवेदन देतांना पदाधिकारी उपस्थित होते.
