VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
गडचिरोली/नगरी,२८ जुलै २०२४::-या अंतर्गत नगरी शालेय परिसरात मध्यवर्ती रोपवाटिका गडचिरोली वनविभाग अंतर्गत मोफत 40 फळझाडांची लागवड करून, पालकांचा सहभाग घेऊन वृक्ष संवर्धनासाठी पालक म्हणून प्रत्येक झाडांना विद्यार्थ्यांच्या आईचे नाव देण्यात आले, आजच्या या विशेष कार्यक्रमाचे अतिथी म्हणून पंचायत समिती गडचिरोलीचे संवर्ग विकास अधिकारी* *आदरणीय: “”गोंगले साहेब”” ,तसेच विस्तार अधिकारी पाल साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती राजूभाऊ नैताम,गावचे सरपंचा भूमिकाताई बारसागडे, सदस्य अनुसया वाघरे ,उपसरपंच अस्मित बारसागडे, इत्यादी मान्यवर पालकसह विद्यार्थी,शिक्षक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र घुगरे ,विषय शिक्षिका सुषमा मडावी, विलास भोयर सर, हर्षलता कुमरे मॅडम, वैष्णवी बांबोळे, शरद बारसागडे, रंजीत मःशाखेत्री, कैवल्य फाउंडेशन तर्फे आदरणीय हेमंत सर, भामिनी पाल मॅडम, अस्मिता वसावत मॅडम, उपस्थित होते , पिरामिल फाउंडेशन तर्फे आज इको क्लबच्या सौजन्याने मुलांच्या चित्रकला स्पर्धा ,निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, नगरी गाव ड्रॉप आऊट बॉक्स , इत्यादी उपक्रम घेऊन उत्कृष्ट स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसचे वितरण करण्यात आले, आजच्या कार्यक्रमाला बहुसंख्येने माता पालक देखील उपस्थित होते ,भर पावसात आदरणीय गोंगले साहेबांनी आपला अमूल्य वेळ भरपूर दिल्यामुळे व व शाळेतील भौतिक सुविधांची , विज्ञान केंद्रांची, संगीत वर्गांची,प्रत्यक्ष मुलांच्या वर्गांची पाहणी करून गुणवत्ता बाबत , वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन बाबत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले, व आजच्या भर पावसात शालेय विद्यार्थ्यांच्या शंभर टक्के उपस्थितीबाबत व कार्यक्रमाच्या नियोजन व आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले, तसेच शालेय भेटीबाबत गावकऱ्यांनी त्यांचे शतशः आभार मानले.
