VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे घरांची पडझड झालेल्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांची मागणी.
गडचिरोली,३१ जुलै २०२४::- गडचिरोली तालुक्यातील लांजेडा, येथील महेश वासेकर, इंदिरानगर येथील संजय नैताम यांची गेल्या आठ दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे घरांचे छत्रे उडून घरांची पडझड झालेली आहे. गडचिरोली तालुक्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी पाहणी करून त्या पीडित कुटुंबांना घराचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.
घरांची पाहणी करतांना गडचिरोली शहर अध्यक्ष सतिश विधाते,गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नितेश राठोड, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश भाऊ टिकले, संजय नैताम , महेश वासेकर, उपस्थित होते.
