Sunday, September 13, 2026
HomeChamorshiकुणबी समाजाने सज्जनशक्तीच्या पाठीशी राहावे, प्रख्यात वक्ते भास्करराव उरकुडे,, चामोर्शी येथे...

कुणबी समाजाने सज्जनशक्तीच्या पाठीशी राहावे, प्रख्यात वक्ते भास्करराव उरकुडे,, चामोर्शी येथे समाज बांधव व आ.डॉ. देवरावजी होळी मित्रपरिवाराच्या वतीने कुणबी मेळाव्याचे आयोजन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

मेळाव्याला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित

कुणबी समाजाचे मेळावे आयोजित करणारे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे केले विशेष अभिनंदन.

गडचिरोली/चामर्शी,२७ ऑगस्ट २०२४::- आज देशामध्ये सज्जनशक्ती व वाईट शक्ती यामध्ये युद्ध सुरू असून सज्जन व वाईट शक्तीची ओळख करण्याची आवश्यकता आहे.

राष्ट्र सर्वप्रथम ही भावना ठेवून मागील १० वर्षांपासून सतत देशहिताच्या दृष्टीने काम करणाऱ्या सज्जनशक्तीच्या मागे कुणबी समाजाने उभे राहावे असे प्रतिपादन प्रख्यात वक्ते अध्यापक भास्करराव उरकुडे यांनी चामोर्शी येथील कुणबी समाज बांधवांच्या मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना केले.**यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. देवरावजी होळी यांचेसह डॉ.धनराज नागपुरे महाराज, माजी सभापती वंदना गौरकार, विनोदजी गौरकार, संजय खेडेकर, राजू पा. चुधरी, नामदेव पा. किणेकर, सरपंच जितेंद्र हुलके, नेमाजी घोगरे पुरुषोत्तम घ्यार मनोहर बामणकर, कपिल पाल, भाऊजी दहेलकर, पुरुषोत्तम बोरकुटे, सुरेश फरकडे, आनंदराव खरबनकर, देशमुख साहेब, वसंत चौधरी, भोजराज भगत, पवन रामगिकार, तथा समाज बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते.**या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थी नवनियुक्त कर्मचारी व अधिकारी जेष्ठ नागरिक , सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन वसंत चौधरी तर आभार प्रदर्शन संजयजी खेडेकर यांनी केले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular