Friday, May 22, 2026
HomeGadchiroliप्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी संविधान व डॉ.बाबासाहेबांचा नेहमीच सन्मान केला...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी संविधान व डॉ.बाबासाहेबांचा नेहमीच सन्मान केला…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

मा.खा.अशोकजी नेते यांचे संविधान जागर यात्रेत प्रतिपादन.

संविधान जागर यात्रा…संविधान जागर यात्रेत सडेतोड काँग्रेसवर हल्लाबोल.

Gadchiroli/२८ ऑगस्ट २०२४::- संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त संविधान जागर यात्रेचे आयोजन गडचिरोली शहरात रथयात्राने रॅली काढून सभा आयोजित करण्यात आले होते.या संविधान जागर यात्रेला माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी संबोधीत करतांना म्हणाले पंतप्रधान मोदीजी यांनी २६ नोव्हेंबर संविधान दिन संपुर्ण देशामध्ये साजरा करण्यात मोलाचा वाटा आहे.मोदीजी यांनी मागील १० वर्षात प्रगतीशिल, विकासशिल भारत घडविण्यासाठी अनेक योजना आणल्या. दीन-दलित, शोषित, वंचितांपर्यंत त्या योजनाही पोहोचवण्यात आल्या. देशाला विकासाची दृष्टी देण्यासोबत आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची दूरदृष्टी त्यांनी दाखविली.

माजी खासदार अशोकजी नेते,

परंतू विरोधकांनी मतदारांची दिशाभूल करत संविधान बदलविणार असल्याचा अपप्रचार केला. त्यात ‘अब की बार, 400 पार’च्या नाऱ्यामुळे मतदारांच्या मनात आणखी शंकेला वाव मिळाला. मात्र गेल्या 10 वर्षात संविधानाच्या आधारेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जी सरकार चालवित असुन जेव्हा ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळी संसदेची पायरी ओलाडतांना नतमस्तक झाले.व म्हणाले जर बाबासाहेबांनी संविधान लिहलं नसत तर पंतप्रधान म्हणून मी सुद्धा या खुर्ची वर बसलो नसतोय हे संविधानाची ताकत आहे.

संविधान जागर यात्रा,

संविधान निर्मिती डॉ. बाबासाहेबांचा व संविधानाचा सन्मान केला आहे.तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी तर जिवंतपणी स्वतःलाच भारतरत्न घोषित केले, मात्र बाबासाहेबांना भारतरत्न देण्यापासून वंचित ठेवले. भारतरत्न देण्याचे काम भाजप सरकारच्या कार्यकाळात झाले आहे.असे मत माजी खासदार अशोकजी नेते यांनी संविधान जागर यात्रेच्या समारोपीय प्रसंगी केले. पुढे बोलतांना भारताच्या संविधानातील कधीच न बदलविणारे मुलभूत हक्क व संविधानाच्या हत्येचा प्रयत्न करणारी हीच ती काँग्रेस आहे. संविधानाची निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनी केली. याच संविधानाचा वापर काँग्रेसनी वारंवार पुढे आणुन दलितांची व मतदांराची दिशाभुल करित आहे.बाबासाहेब हे संसदेत जाण्यासाठी निवडणुकीत उभे होते.त्यावेळी याच काँग्रेसच्या लोकांनी एक नाहीतर दोनदा पराभव करून संसदेत जाण्यापासून रोखण्याचे महापाप काँग्रेस पक्षाने केलेले आहे.म्हणुन बाबासाहेब हे नेहमी म्हणत काँग्रेस हे जळते घर आहे.लोकसभेत संविधान बदलविणार व महिलांच्या खात्यात खटाखट महिण्याला साडेआठ हजार रुपये जमा करुन असे खोट आश्वासन देत व भूलथापांने संविधान समोर आणुन काँग्रेस नी लोकसभेत विजय‌ मिळवला. काँग्रेस हे जातीपातीचे राजकारण करते पण भाजपा हा विकासाभिमुख व जनकल्याणासाठी सतत कार्य करते.असे प्रतिपादन माजी खासदार अशोकजी नेते यांनी समारोपीय मार्गदर्शनात केले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने आमदार डॉ. देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे,प्रदेश उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे ॲड. वाल्मिक (तात्या )निकाळजे,सामाजिक संघटनेचे नेते राजेंद्र गायकवाड, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे,लोकसभा समन्वयक प्रमोद जी पिपरे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, अनु .जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. उमेशजी वालदे,डॉ. चंदाताई कोडवते, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,केशव निंबोड, जनार्धन साखरे, प्रा. अरुण उराडे, योजनाताई ठोकले,स्नेहाताई भालेराव, आकाश अंभोरे, विजय गव्हाळे, नागसेन पुंडके, देवाजी लाटकर,वर्षा शेडमाके,दिपक जाधव,ज्ञानेश्वर बावणे,नामदेव काटवले,लता लाटकर, यांचे सह पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.*संविधान जागर यात्रा रॅली ही ढोलताशांच्या गजरात व फटाके च्या आतिषबाजी न निघाली हे विशेष…* भारतीय संविधानाचा विजय असो,भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचा विजय असो विजय असो.. अशा जय घोषाने शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स पासून ते गडचिरोली शहरातून आठवडी बाजार,हनुमान मंदिर तेली मोहल्ला,सराफा लाईन, तळघर,वंजारी मोहल्ला, गुजरी वार्ड,सर्वोदय वार्ड, फुले वार्ड, या फुले वार्डातील बुद्ध विहार येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पाने माल्यार्पण करत पुजन केले.नंतर श्री संत रोहिदास महाराज समाज मंदिर सभागृहामध्ये संविधान जागर यात्रेचा समारोप व सभेचे आयोजन करण्यात आले.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular