
VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी
विश्व हिंदु परिषद व बजरंग दल गडचिरोलीच्या वतीने दहीहंडी कार्यक्रमाच्या आयोजनात नगरसेवक इंजि. प्रमोदजी पिपरे व इंजि.अनुरागजी पिपरे यांची प्रमुख उपस्थिती.
गडचिरोली,३० ऑगष्ट२०२४::- विश्व हिंदु परिषद व बजरंग दल गडचिरोली च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्ठमि निमित्त आयोजित भव्य-दिव्य दहीहंडी कार्यक्रमाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.तर अध्यक्ष स्थान विश्व हिंदू परिषदेचे मा.रामायणजी खटी यांनी भूषविले.प्रमुख अतिथी म्हणुन माजी खासदार अशोकजी नेते, इंजि.प्रमोदजी पिपरे,प्रा.प्रशांत वाघरे,रमेशजी भुरसे,प्रशांत भ्रूगवार,डॉ. भारत खटी, तिलोतमा हाजरा तसेच विश्व हिंदू परिषद व बजरंग दल गडचिरोली चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
