Saturday, May 23, 2026
HomeGadchiroliकबड्डी खेळात मन उत्साही व शरीर तंदुरुस्त ताकदवर बनते, मा.खा.अशोकजी नेते यांचे...

कबड्डी खेळात मन उत्साही व शरीर तंदुरुस्त ताकदवर बनते, मा.खा.अशोकजी नेते यांचे कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रतिपादन…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी

नवयुवक सार्वजनिक बालगणेश मंडळ पोटेगांव यांच्या वतीने मुले-मुली कबड्डी स्पर्धेचे आयोजन.

गडचिरोली,१५ सप्टेंबर २०२४ ::- मौजा-पोटेगांव येथे नवयुवक सार्वजनिक बाल गणेश मंडळ, पोटेगांव यांच्या वतीने मुले-मुली व प्रोढ व्यक्ती यांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या भव्य कबड्डी स्पर्धेतील बक्षीस वितरण समारोप कार्यक्रम माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांच्या हस्ते व अध्यक्षतेखाली पार पडला.या कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारोप कार्यक्रमाला मा.खा.अशोकजी नेते यांनी अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना म्हणाले आजच्या युगाचा तरुण युवा नौजवान युवक वर्ग असुन या मंडळाचे नाव सुद्धा नवयुवक बाल गणेश मंडळ आहे हे एक युवकांची स्तुती आहे. या नवयुवक गणेश मंडळाने या ठिकाणी मुले – मुली व प्रोढ असे गट पाडून कबड्डी स्पर्धेचा खेळ खेळण्यात आला.कबड्डी खेळात मन उत्साही व शरीर तंदुरुस्त ताकदवर बनते. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला.या कबड्डी स्पर्धेच्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देत स्पर्धा म्हटलं तर हार जीत होणे साहजिकच आहे.विजयी संघाचे अभिनंदन परंतु पराजय संघाने पराजयाला हार न मानता पुढे प्रयत्न करत विजयी करावे.याबरोबरच मि माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विकासाभिमुख कामे केली यामध्ये वडसा गडचिरोली रेल्वे मार्ग, तसेच जिल्ह्यामध्ये रेल्वेचे जाळे,मेडिकल काॅलेज,कृषि महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती, हवाई पट्टा,रस्त्याचे कामे, नँशनल हाँयवे ची कामे, सिंचनाच्या बाबतीत चिचडोह बॅरेजेस, कोटगल बॅरेजेस, असे अनेक विविध विकासाचे कामे लोकसभा क्षेत्रात केलेली आहेत.तसेच या प्रसंगी मला पोटेगांव वासिय जनतेकडून या ठिकाणी क्रीडांगण (ग्राउंड ) व वाचनालयाची मागणी केली.यासंबंधी मी लक्ष घालून आपण ग्रामपंचायत चा ठराव व कागदपत्रे द्यावा. गावातल्या कोणत्याही समस्या आणि अडीअडचणी असल्यास मी निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करीन. असा विश्वास देतोय. आपण लोकसभेच्या निवडणूकीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या केलेल्या सहकार्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो.असे प्रतिपादन या बक्षीस वितरण समारोपाला मा.खा.नेते यांनी केले. याप्रसंगी जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम यांनी हसत खेळत वक्तव्य केले तर महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस यांनी महिला च्या बाबतीत विस्तृत मार्गदर्शन उपस्थितांना केले.यावेळी कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस समारोप कार्यक्रमाला मंचावर प्रामुख्याने जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस सौ.रेखाताई डोळस,कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी पेटकर,सरपंच अर्चनाताई सुरपाम,उपसरपंच नरेंद्र मोहरले,ग्रा.प.सदस्य किशोर मुनरतीवार,ग्रा.प.सदस्य शालु गेडाम,भजेंद्र पातर,उमाकांत सुरपाम,मनोज शेडमाके,अंकुश अलाम तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी व मोठया संख्येने गावातील नागरिक व खेळाडू तसेच विद्यार्थीनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular