Saturday, May 23, 2026
HomeChamorshiरेगडी कन्नमवार जलाशय जवळील 14 गावांना सिंचनाची सोय करून राज्यसरकारने न्याय द्यावा...

रेगडी कन्नमवार जलाशय जवळील 14 गावांना सिंचनाची सोय करून राज्यसरकारने न्याय द्यावा – डॉ.प्रणय खुणे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने मागणी…

VAINGANGA NEWS 24 / विशेष प्रतिनिधी

पन्नास वर्षापासून रेगडी परिसरातील शेतकऱ्यांची सिंचनाची व्यथा.

पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता संतोष वाकुडकर यांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने देण्यात आले निवेदन.

गडचिरोली/ चामोर्शी, ०७ डिसेंबर २०२४::- रेगडी कन्नमवार जलाशय रेगडी धरणावरून चवदा गावाच्या उपसा सिंचन योजनेला मान्यता देणे बाबत चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय दीना प्रकल्पचा उगम जिथून होतो तेथील नागरिकच सिंचनाच्या सोयीपासून वंचित आहेत* *त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील दिना प्रकल्प कन्नमवार जलाशय लाभक्षेत्रात न येणारे चेक चापलवाडा, चनकापूर , मकेपल्ली , गोलबंद्री , चापलवाडा , गांधीनगर , वरूर पलासपूर , पोतेपल्ली , माडेआमगाव,श्यामनगर , सिमुलतला या 14 गावाच्या लोकांनी दीना प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून शेती सिंचनासाठी गेल्या 1982 पासून पाण्याची मागणी केली आहे व सदर मागणी गेल्या पन्नास वर्षांपासून प्रलंबित आहे त्या अनुषंगाने सदर गावांना दिना प्रकल्पातून सिंचनाची सोय करून देण्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले.

त्या सर्वेक्षणानुसार सदर गावातील भूतलांक दीना प्रकल्पाचे मुख्य कालवा तलांकापेक्षा वर आहे त्यामुळे दीना प्रकल्पातून प्रभावी पद्धतीने पाणी देण्यास अडचण निर्माण होत आहे असे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्या अहवालातून स्पष्ट होत आहे परंतु सदर 14 गावांना सिंचनाकरीता पाणी देण्यासाठी काय उपाय योजना करण्यात येऊ शकते व रेगडी दीना धरणाला लागून असलेल्या या 14 गावांना न्याय देण्यासाठी व पुढील उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे वतीने या चवदा गावांना न्यायाच्या मागणीसाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व राज्य सरकारने रेगडी कन्नमवार जलाशय येथून या भागात तात्काळ या चवदा गावांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदणाद्वारे करण्यात आली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपविभागीय अभियंता संतोष वाकुडकर साहेब यांना गडचिरोली येथील पाटबंधारे मुख्य कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी पाटबंधारे विभागाचे एक्झिकेटिव्ह अभियंता राहुल मोरघडे यांच्यासोबत भ्रमणध्वनीने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ वाघरे यांनी या मागणीबाबत संवाद साधून उपाय योजना करण्याची मागणी केली व त्यांनी सकारात्मक उत्तर दिले यावेळी राज्य सरकारने या 14 गावांना न्याय न दिल्यास लवकरच या चौदा गावातील लोकांना घेऊन विराट जन आंदोलन उभारण्यात येईल इशाराही देण्यात आला, यावेळी प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ वाघरे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, येथील चवदा गावाचे प्रणेते गुरुदास पालकवार, दिवाकर भट्टलवार, नवनाथ माधवार, व शेकडो चवदा गावातील नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,*

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular