Wednesday, August 5, 2026
Homeनवी दिल्लीआताची मोठी बातमी "अर्थव्यवस्थेचा सरदार हरपला" माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे...

आताची मोठी बातमी “अर्थव्यवस्थेचा सरदार हरपला” माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे दुःखद निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

नवी दिल्ली, २७ डिसेंबर २०२४::- भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे आज 26 डिसेंबर 2024 रोजी दुःखद निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.डॉ. मनमोहन सिंह यांना श्वासोश्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री डॉ.मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली. 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठले त्यावेळी डॉ. मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली.पण डॉ.मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यानंतर 2009 साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले.सन 1996 साली डॉ.मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2004 साली यूपीएची सत्ता आल्यानंतर डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाचे 13 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 2004 ते 2014 या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं. एप्रिल 2024 साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular