Wednesday, July 29, 2026
HomeMulcheraसर्व विभागांच्या समन्वयातून तालुक्याचा विकास करा - आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे निर्देश...

सर्व विभागांच्या समन्वयातून तालुक्याचा विकास करा – आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे निर्देश…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

मुलचेरा पं. स. ची वार्षिक आमसभा.

गडचिरोली/मुलचेरा, २५ जानेवारी २०२५::- या भागाचा विकास व्हावा म्हणून १९९२ ला मी मंत्री असताना चामोर्शी तालुक्याचा विभाजन करून मुलचेरा तालुक्याची निर्मिती केली.येथील नागरिकांना चामोर्शी ऐवजी मुलचेरातच सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्या.तालुका छोटा असला तरी माझ्या विधानसभा क्षेत्राचा एक भाग म्हणून निधी देताना मुलचेराला प्रथम प्राधान्य दिला आहे.

यापुढे देखील निधीची कमतरता भासू देणार नाही. मात्र विकासकामे करताना सर्व विभागांनी समन्वय ठेवा,असे निर्देश आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी दिले.शुक्रवार २४ जानेवारी रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली मुलचेरा पंचायत समितीची वार्षिक आमसभा पार पडली.यावेळी ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते तथा अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम,मुलचेरा पंचायत समितीचे माजी उपसभापती महेंद्र बाबा आत्राम,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास,पंचायत समितीचे माजी सभापती सुवर्णा येमुलवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, तहसीलदार चेतन पाटील,

गटविकास अधिकारी एल.बी. जुवारे,ठाणेदार महेश विधाते,राकॉचे जेष्ठ कार्यकर्ते रंजित स्वर्णकार,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसूला, सुंदरनगरचे सरपंच जया मंडल,गटशिक्षणाधिकारी धनंजय कांबळे,प्रभारी बालविकास अधिकारी अमरी रॉय,प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस.एच.सुतार,पेडीगुडमचे वनपरिक्षेत्र अधिकारी भावना अलोने,डेव्हिड भोगी आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक गटविकास अधिकारी एल बी जुवारे यांनी केले. त्यानंतर मागील वार्षिक आमसभेचा इतिवृत्त वाचन करण्यात आले.त्यांनतर आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी मागील आमसभेतील प्रलंबित कामांचा प्रत्येक विभागाचा आढावा घेतला व ते पूर्ण झाल्याची खात्री करून घेतली.

त्यानंतर यंदाचे मंजूर कामे,येणारे अडचण,रखडलेल्या कामांचा आढावा घेत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानउघाडणी केली तसेच हाती घेतलेली कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले.यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्याची समस्या, रखडलेले घरकुल,खडतर रस्ते, विजेची समस्या,बस सुविधा तसेच नगर पंचायत अंतर्गत गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेली पाण्याची समस्या नागरिकांनी मांडल्या. लगेच आमदार आत्राम यांनी संबंधित विभागांना समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.आमसभेत ग्रामसेवक युनियन आणि शिक्षक संघटनांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचा शॉल,श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी लाभार्थ्यांना आमदार हात्राम यांच्या हस्ते योजनांचा लाभ देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी केंद्रप्रमुख महेश मुक्कावार यांनी केले.*दोन उपकेंद्राची केली मागणी*मुलचेरा तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्र असून सुंदरनगर प्राथमिक उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या हरीनगर येथे मागील अनेक वर्षांपासून उपकेंद्राची मागणीचे प्रस्ताव पाठवूनही उपकेंद्र मंजूर झाले नाही.

तसेच मोहूर्ली गावात देखील नवीन उपकेंद्राची नागरिकांनी मागणी केली आहे.तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी बोरी येथे जावे लागत असून धान विक्रीसाठी गोडाऊन मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular